loader
Breaking News
Breaking News
Foto

घेरारसाळगडातील पाच वाड्यांत पाणी टंचाई

खेड (प्रतिनिधी) - तालुक्यातील पाणीटंचाईची समस्या लांबणीवर पडलेली असतानाच घेरारसाळगडातील पाच वाड्यांसह कासईतील बोरवाडीनेही टँकरच्या पाण्यासाठी प्रशासनाकडे धाव घेतली आहे. गाववाड्यांचे सर्वेक्षण करून टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. गेल्या वर्षी फेब्रुवारीतच टँकरच्या पाण्यासाठी येथील प्रशासनाकडे पहिले अर्ज प्राप्त झाले होते. यंदा तालुक्यात जलजीवन मिशन योजनेंतर्गत राबवण्यात आलेल्या नळपाणी योजनांमुळे वर्षानुवर्षे टंचाई आराखड्यात समाविष्ट गाव-वाड्या 'पाणीदार' झाल्यामुळे टंचाईची समस्या लांबणीवरच पडली. गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात रणरणत्या उन्हाने कहर केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यामुळे घेरारसाळगडातील भराडे धनगरवाडी, तांबटवाडी, बौद्धवाडी, पेठवाडी, निमणी-धनगरवाडी येथे जलस्रोत आटल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण सुरू झाली आहे. यामुळे पाचही वाड्यांतील ग्रामस्थांचा टँकरच्या पाण्यासाठी पहिला अर्ज पंचायत समितीकडे दाखल झाला आहे. या पाठोपाठच कासई-बोरवाडी येथेही पाण्याचा ठणठणाट निर्माण झाल्याने ग्रामस्थांनी टँकरच्या पाण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. घेरारसाळगडातील पाच वाड्यांमध्येच तालुक्यातील पाण्याचा पहिला टँकर धावण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. टंचाईच्या पार्श्वभूमीवर येथील पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाने काही दिवसांपूर्वीच शासकीय पाण्याच्या टँकरची दुरुस्ती करत तो सुस्थितीत आणला आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg