खेड (प्रतिनिधी) - रत्नागिरी जिल्ह्यातील कोरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरोधात खाडीपट्ट्यातील महिलांनी तीव्र आंदोलन छेडत मोर्चा काढला. संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याची बदली झाल्यानंतरही त्यांनी अद्याप पदभार आणि शासकीय निवासस्थान न सोडल्याचा गंभीर आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. याशिवाय ड्युटीवर असताना ग्रामीण भागातील रुग्णांकडून अनधिकृत पैशांची मागणी, रुग्णांशी उद्धट वर्तन तसेच कर्तव्यात अनियमितता होत असल्याचा आरोप महिलांनी केला. या सर्व प्रकारांमुळे महिलांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, मोर्चाच्या वेळी संबंधित डॉक्टर अनुपस्थित असल्याने आंदोलनकर्त्यांचा रोष आणखी वाढला. बदली झालेल्या डॉक्टरांनी तात्काळ कार्यभार सोडून नवीन ठिकाणी हजर व्हावे, शासकीय क्वार्टर रिकामे करावे, तसेच नव्याने नियुक्त डॉक्टरांनी तत्काळ रुजू व्हावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच केंद्रातील रिक्त पदे तातडीने भरावीत आणि रुग्णांकडून अनधिकृतरित्या घेतलेल्या पैशांची लाचलुचपत विभागामार्फत सखोल चौकशी करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्या अंकिता शिगवण आणि पालकर यांनी केली. या आंदोलनात पंचायत समिती सदस्य निसार सुर्वे आणि समीक्षा म्हादे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या.






























.jpeg)





































































































































































































































































.jpg)























































































.jpg)





























.jpg)


































































































































































































































































































































.jpg)

























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.