loader
Breaking News
Breaking News
Foto

परशुराम घाटात भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, तिघे जखमी

खेड (दिलीप देवळेकर) : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाट येथे शनिवार दि. ४ एप्रिल रोजी मध्यरात्री सुमारे १२.१५ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून तिघेजण जखमी झाले आहेत. जखमींवर चिपळूण येथील लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, प्रतीक संजय भंडारी (वय २८, रा. कांची, ता. नाशिक) हा आपल्या मित्रांसह महेंद्र XUV300 (MH 15 JH 0516) या कारने गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी जात होता. परशुराम घाट परिसरात आल्यानंतर चालकाने आपल्या ताब्यातील कार भरधाव वेगात चालवली आणि त्याचा वाहनावरील ताबा सुटला. यामुळे कार रस्त्याच्या डाव्या बाजूला जाऊन पलटी झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या भीषण अपघातात रोहित संतोष भालेकर (वय २८, रा. इंदिरानगर, नाशिक) यांचा मृत्यू झाला. तर कृष्णा संपत आव्हाड (वय ३३, रा. चापडगाव, ता. निफाड), संदीप चंद्रभान डेरिंगे (वय ३६, रा. पळसे, नाशिक) तसेच चालक प्रतीक भंडारी हे जखमी झाले असून त्यांना तत्काळ उपचारासाठी चिपळूण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस मदत केंद्र चिपळूण येथील पथकाने अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक इर्शाद बेग यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल खोंदल व नटे यांनी तत्परतेने मदतकार्य केले. या अपघातात संबंधित वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पुढील तपास खेड पोलीस ठाण्याकडून करण्यात येत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg