loader
Breaking News
Breaking News
Foto

रिंगणेत आजपासून श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा

केळंबे-लांजा(सिराज नेवरेकर) - लांजा तालुक्यातील श्री हनुमान मंदिर ट्रस्ट रिंगणे पेडणेकरवाडी यांच्यावतीने बुधवार दि. १ एप्रिल ते शुक्रवार दि. ३ एप्रिल या कालावधीत शताब्दी पावन शतकोत्तर श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा सलग तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांनी पार पडणार आहे. यामध्ये पहिल्या दिवशी बुधवार दि.१ एप्रिल रोजी सकाळी ९ वा. महापुरुष अभिषेक, १० वा. श्री. हनुमान अभिषेक, दुपारी १ वा. महाप्रसाद, सायंकाळी ४ वा. श्री सत्यनारायण महापूजा, आरती व प्रसाद ७ वा. स्थानिक मंडळी भजन, रात्री ८ वा. भाविकांसाठी महाप्रसाद, ९. ३० वा. मुलांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम तर गुरुवार दि.२ एप्रिल रोजी सकाळी ५.३० वा. श्री हनुमान जन्मोत्सव कीर्तन (किर्तनकारः ह. भ. प. श्री. गोरखनाथ महाराज पिंजारी, सातारा), ८ वा. चहा व अल्पोपहार ९ वा. मंदिर प्रदक्षिणा ११:०० वा. श्री हनुमंतरायांची श्री राम भेट, दुपारी १२ वा. आरती व प्रदक्षिणा समारोप, १ वा. महाप्रसाद, ३वा. हळदीकुंकू, सायं. ७ वा. श्री हनुमान पालखी नृत्य,रात्री ८ वा. महाप्रसाद, ९ वा. मान्यवरांचे स्वागत, सत्कार व बक्षीस समारंभ तर रात्री १० वा.लपाछपी हे दोन अंकी नाटकाचा प्रयोग सादर होणार आहे. यासह शुक्रवार दि. ३ एप्रिल रोजी स. १० वा. श्री हनुमान अभिषेक, दु. १ वा. महाप्रसाद, दु. ३ वा. नवसफेड व समारोप असा विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमानी श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा पार पडणार आहेत. या कार्यक्रमाचा लाभ भक्त-भाविकांनी घ्यावा असे आवाहन श्री हनुमान मंदिर ट्रस्ट रिंगणे पेडणेकरवाडी यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg