loader
Breaking News
Breaking News
Foto

सीमा शुल्क विभागाची मोठी कारवाई केली, बिबट्याच्या दोन कातड्यांसह चार तस्करांना अटक

रत्नागिरी : कोल्हापूर शहराच्या महामार्गावर सीमा शुल्क विभागाने रविवारी पहाटे एक मोठी कारवाई केली. बिबट्याच्या दोन कातड्यांसह चार तस्करांना शितापीने अटक केली आहे. या कारवाईत तस्करीसाठी वापरलेली एक 'किया सेल्टोस' कार आणि काही संशयास्पद कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत. वन्यजीव (संरक्षण) कायदा, १९७२ अंतर्गत प्रतिबंधित असलेल्या बिबट्याच्या कातड्यांची बेकायदेशीर विक्री आणि वाहतूक होणार असल्याची खात्रीशीर माहिती सीमा शुल्क विभागाचे अधीक्षक हिमांशू शर्मा यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे २९ मार्च २०२६ ला पहाटेच्या सुमारास कोल्हापूर जवळच्या महामार्गावर विशेष मोहीम आखण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अधीक्षक हिमांशू शर्मा यांच्या नेतृत्वाखालील पथकात अधीक्षक लक्ष्मीकांत भातकर, संदीप कौशिक, निरीक्षक राजेश लाडे, रोहित भालेकर, रितिक कुंभलवार, रमेश गुप्ता, अंकित सिन्हा, तसेच हवालदार संजय जाधव आणि अभिषेक यादव यांचा समावेश होता. या पथकाने अत्यंत वेगाने आणि नियोजनबद्धरीत्या ही कारवाई केली. या कारवाईमध्ये बिबट्याची २ कातडी, मरून रंगाची किया सेल्टोस (Kia Seltos) कार, तपासात उपयुक्त ठरणारी महत्त्वाची कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे मिळून आलीत.

टाईम्स स्पेशल

या प्रकरणात एकूण ४ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये कुडाळ (सिंधुदुर्ग) येथील दोन, तर सातारा आणि लातूर येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. या सर्व आरोपींना कोल्हापूरच्या वडगाव येथील 'न्यायालयीन दंडाधिकारी प्रथम श्रेणी' यांच्यासमोर हजर करण्यात येणार आहे. अशा प्रकारचे वन्यजीव तस्करीचे प्रकार आढळल्यास तातडीने कस्टम विभागाला कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिक ७२१९२१२३०४ या क्रमांकावर फोन किंवा मेसेजद्वारे माहिती देऊ शकतात. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल, असेही विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. बेकायदेशीरपणे अशा वस्तू जवळ बाळगणाऱ्यांवर सीमा शुल्क कायदा १९६२ आणि वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ नुसार कडक कारवाई केली जाईल.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg