loader
Breaking News
Breaking News
Foto

दोडामार्ग तालुक्यातील गिरोडा, वझरे, आयी येथे वन कर्मचार्‍यांची धाड; अवैध खैर साठा जप्त

दोडामार्ग (प्रतिनिधी) - दोडामार्ग तालुक्यातील माटणे मतदार संघातील काही गावात मोठया प्रमाणात खैराचे झाडे तोडून नंतर साल काढून विक्री करणारी मोठी टोळी कार्यरत आहे. अशाच प्रकारे गिरोडा, वझरे, आयी, येथे, अवैध खैराचे लाकुड तोडून साल काढून वाहतूक केली जाणार याची माहिती दोडामार्ग वन कर्मचारी यांना मिळताच वन क्षेञपाल संभाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली धाड टाकून तीन ठिकाणी अवैध खैराचे लाकुड जप्त केले. कारवाई दरम्यान काही जण फरार झाले. दोडामार्ग वन विभागकडून हजारो रुपये किंमतीचे खैराचे लाकुड जप्त करण्यात आले. अधिक तपास सुरू आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दोडामार्ग तालुक्यातील गिरोडा, वझरे, आयी, आंबडगाव तसेच इतर ठिकाणी किंवा नजीकच्या गोवा येथून खैराची झाडे तोडून तुकडे करून आणले जातात. काही दिवसांपूर्वी आंबडगाव येथे काही लोकांच्या खाजगी जंगलातील लाखो रुपये किंमतीचे खैराचे लाकुड तोडून नेले होते. तेव्हा पाठलाग केला असता मोटार सायकल लाकुड टाकून संशयित फरार झाले होते. मोटार सायकल वन विभाग यांच्या ताब्यात दिली होती. मिळालेल्या माहितीनुसार वरील ठिकाणी धाड टाकून तीन ठिकाणी हजारो रुपये किंमतीचे खैराचे लाकुड जप्त करून ते दोडामार्ग वन कार्यालयात जमा करण्यात आले. अशी माहिती वन क्षेञपाल संभाजी पाटील यांनी दिली.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg