संगलट खेड (इक्बाल जमादार) - महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेला किल्ले रायगड आज मूलभूत सुविधांच्या अभावामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वी किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी निर्माण करताना गडावर केलेले जलसागर व बांधलेल्या विविध भागांतील पाण्याच्या टाक्यांमुळे आजही लक्षावधी शिवभक्तांना त्याची प्रचिती एप्रिल मे महिन्यामध्ये भेटी दरम्यान मिळत आहे. या पार्श्वभूमीवर किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या पाचाड सह विविध गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई गेल्या दशकांपेक्षा जास्त काळापासून भेडसावत असून प्रशासनाच्या निष्क्रियते विरोधात शिवभक्तांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
छत्रपती यांच्या राजधानीचा दर्जा लाभलेल्या या ऐतिहासिक स्थळाच्या परिसरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, प्रशासनाच्या कथित दुर्लक्षामुळे शिवभक्तांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. स्थानिक नागरिक, गडावर काम करणारे कर्मचारी तसेच दूरदूरहून येणारे पर्यटक यांना पाण्यासाठी मोठी गैरसोय सहन करावी लागत आहे. उन्हाळ्याच्या तडाख्यात परिस्थिती अधिकच बिकट झाली असून, पिण्याच्या पाण्यासाठीही लोकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत असल्याचे समोर आले आहे. इतक्या महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळी मूलभूत सुविधा उपलब्ध नसणे ही प्रशासनासाठी लाजिरवाणी बाब असल्याची टीका होत आहे.
शिवभक्तांनी संतप्त प्रतिक्रिया देत प्रशासनावर थेट निष्क्रियतेचा आरोप केला आहे. ज्या गडावरून स्वराज्याचा कारभार चालला, त्या राजधानी परिसराची आज अशी दयनीय अवस्था का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरवर्षी लाखो पर्यटक येऊनही सुविधा करण्यासाठी ठोस उपाययोजना का होत नाहीतयावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. याशिवाय, पाणीटंचाईमुळे स्वच्छतेच्या समस्या देखील गंभीर बनल्या आहेत. शौचालयांची अपुरी व्यवस्था, आणि पर्यटकांना भेडसावणाऱ्या अडचणी यामुळे रायगडची प्रतिमा धोक्यात येत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्थानिकांकडून आणि विविध संघटनांकडून प्रशासनाला वारंवार निवेदने देऊनही परिस्थितीत कोणताही ठोस बदल दिसून येत नसल्याच सांगण्यात आले आहे.































































































































1.jpg)













.jpg)




























































.jpeg)





































































































































































































































































.jpg)























































































.jpg)





























.jpg)


































































































































































































































































































































.jpg)































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.