loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागर-वरचापाट येथे श्री नर-नारायण महोत्सव निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर-वरचापाट येथील श्री नर-नारायण देवस्थान उत्सव गुहागर-वरचापाट आयोजित मंगळवार दि. ३१ मार्च २०२६ रोजी श्री नर-नारायण महोत्सव (११९ वा वर्धापन दिन) साजरा करण्यात येणार आहे. या महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दि.३१ मार्च रोजी सकाळी ५.३० वा. काकड आरती, सकाळी ८ वा. श्रींची षोडशोपचार पुजा व आरती, दुपारी १२.३० वा. ग्रंथ पारायण आरती व महाप्रसाद, सायं. ५.३० वा.श्री पिंपळादेवी महिला मंडळाचे सुस्वर भजन, सायं. ७ वा. प.पु. गुरुदेवता कलावती आई मंडळाचे भजन, रात्रौ १० वा. सुश्राव्य संगीत भजने, बुधवार दि.१ एप्रिल रोजी सायं. ५ वा. श्री नर-नारायण पालखी सोहळा, गुरुवार दि. २ एप्रिल रोजी सकाळी ६ वा. श्री हनुमान जन्म सोहळा, सायं.५ वा. श्री हनुमान पालखी सोहळा.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शुक्रवार दि. ३ एप्रिल रोजी दु. १२.३० वा. महाप्रसाद, रात्रौ : ९.३० वा. श्री मुळपूरुष प्रासादिक भजन मंडळ, तुळस - वडखोल, ता. वेंगुर्ला, जि. सिंधूदुर्ग यांचे सुश्राव्य भजन. बुवा पुरुषोत्तम परब पखवाज साथ,पांडूरंग परब, तबला साथ: ओंकार मेस्त्री, शनिवार दि. ४ एप्रिल रोजी रात्रौ : १० वा. सुमूखी परफॉर्मिंग आर्टस् फौडेशन मुंबई भरत नाट्यम नृत्याचे सादरीकरण, मुंबई, रात्रौ : ११ वा. :स्थानिक महिलांचे रेकॉर्ड डान्स होणार आहेत. तरी या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री नर-नारायण प्रासादिक मंडळ गुहागर-वरचापाट यांनी केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg