loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीतील 'स्वस्तिक हॉस्पिटल' परिसरात बिल्डरचे रस्त्यावर अतिक्रमण; नगरसेवक केतन शेट्ये आक्रमक

​रत्नागिरी: रत्नागिरी शहरातील राम नाका परिसरात असलेल्या स्वस्तिक हॉस्पिटलच्या जागेत सुरू असलेल्या एका खाजगी बांधकामाने चक्क नगरपरिषदेच्या मालकीच्या रस्त्यावर आणि गटारावर अतिक्रमण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या गंभीर प्रकारामुळे परिसरातील वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला असून, स्थानिक नगरसेवक केतन उमेश शेट्ये यांनी याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी याप्रकरणी मुख्याधिकाऱ्यांना पत्र लिहून तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राम नाका परिसरातील स्वस्तिक हॉस्पिटलच्या जागेत सध्या एका खाजगी विकासकामार्फत मोठ्या प्रमाणावर बांधकासाचे काम सुरू आहे. मात्र, हे काम करत असताना संबंधित विकासकाने नियमांची पायमल्ली केल्याचे दिसून येत आहे. या विकासकाने आपल्या मूळ भूखंडाच्या हद्दीच्या तब्बल ५ ते ६ फूट बाहेर येत नगरपरिषदेच्या मालकीच्या गटारावर आणि मुख्य रस्त्यावर लोखंडी पत्र्यांचे फेंसिंग लावून अतिक्रमण केले आहे. हे अतिक्रमण अशा पद्धतीने करण्यात आले आहे की, सार्वजनिक रस्ता जणू त्या खाजगी भूखंडाचाच हिस्सा असल्याचे भासत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

केवळ रस्त्यावर कुंपण घालूनच हा विकासक थांबलेला नाही, तर त्याने सार्वजनिक रस्त्यावरच चिरे आणि इतर बांधकाम साहित्य उतरवून ठेवले आहे. यामुळे या वर्दळीच्या मार्गावर वाहनांच्या वाहतुकीस आणि पादचाऱ्यांना चालण्यास प्रचंड अडथळा निर्माण झाला आहे. या बेजबाबदार कृत्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट असून, याबाबतच्या तक्रारी नगरसेवकांकडे प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत नगरसेवक केतन शेट्ये यांनी प्रत्यक्ष जागेची पाहणी केली असता, प्रशासकीय नियमांचे उल्लंघन झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी या संदर्भात रत्नागिरी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना लेखी पत्र सादर केले आहे. या पत्रात त्यांनी स्पष्ट नमूद केले आहे की, संबंधित विकासकाने केलेले हे अतिक्रमण तातडीने हटवण्यात यावे. तसेच, रस्त्यावर साठवून ठेवलेले बांधकाम साहित्य जप्त करून रस्ता मोकळा करावा, जेणेकरून नागरिकांची गैरसोय दूर होईल. ​या पत्राची प्रत नगराध्यक्षांनाही पाठवण्यात आली असून, आता नगरपरिषद प्रशासन या मुजोर विकासकावर काय कारवाई करते, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. सार्वजनिक मालमत्तेवर अशा प्रकारे डल्ला मारणाऱ्यांविरुद्ध कठोर पावले उचलली जावीत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg