loader
Breaking News
Breaking News
Foto

देशात दररोज रस्ते अपघातात ३० विद्यार्थ्यांचा मृत्यू; ठाण्यात स्कूलबस चालकांना दिली सुरक्षिततेची ‘डोस थेरपी’!”

​ठाणे (प्रतिनिधी) - देशात दररोज सुमारे ३० शालेय विद्यार्थ्यांचा रस्ते अपघातात मृत्यू होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी चालकांची जबाबदारी आणि त्यांचे मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी ठाण्यात शालेय बस चालकांसाठी विशेष जनजागृती व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात पार पडले. ​परिवर्तन सोशल अँड एज्युकेशन ट्रस्ट आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO), ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया स्कूल येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये सुलोचनादेवी सिंघनिया स्कुल व सुनीतीदेवी सिंघनिया स्कुल आदी शाळांमधील सुमारे २०० बस चालक, महिला अटेंडंट्स आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमात मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अमोल भुसारे यांनी चालकांच्या मानसिक आरोग्यावर प्रकाश टाकला. "दीर्घ कामाचे तास, वाहतूक कोंडी आणि कौटुंबिक ताणतणावामुळे चालकांच्या वर्तनावर परिणाम होतो. व्यसनाधीनता टाळून शांत आणि संयमी राहणारा चालकच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची खरी हमी देऊ शकतो," असे त्यांनी आवर्जून सांगितले. ​केवळ रस्ते सुरक्षाच नव्हे, तर बसमध्ये प्रवासादरम्यान उद्भवणाऱ्या वैद्यकीय आणीबाणीसाठी डॉ. दीपाली कर्णिक यांनी 'सीपीआर' (CPR) चे प्रात्यक्षिक दिले. हृदयविकाराचा झटका किंवा अन्य आपत्कालीन स्थितीत मुलांचा जीव कसा वाचवावा, याचे प्रशिक्षण यावेळी कर्मचाऱ्यांना मिळाले. यासोबतच चालकांची नेत्र, रक्त आणि दंत तपासणीही करण्यात आली.

टाइम्स स्पेशल

​मोटार वाहन निरीक्षक अमोल राठोड यांनी संवादात्मक सत्रातून चालकांना तांत्रिक बारकावे समजून सांगितले. 'ब्लाइंड स्पॉट्स', वेग मर्यादा आणि सुरक्षित ड्रायव्हिंग सवयींवर त्यांनी मार्गदर्शन केले. सत्रानंतर आयोजित प्रश्नमंजुषेतील विजेत्यांना हेल्मेट आणि मेडल देऊन गौरविण्यात आले. या उपक्रमासाठी विकास परबत यांच्यासह आरटीओ ठाणेची रस्ता सुरक्षा टीम, फोस्टर बस सर्व्हिस आणि गोयल बस सर्व्हिस तसेच सिंघनिया स्कुलचे व्यवस्थापक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg