loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडीतील शाळांना आमदार निधीतून संगणक प्रदान; पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते वाटप

​सावंतवाडी (प्रतिनिधी) - सावंतवाडी येथील भटवाडी जिल्हा परिषद शाळा क्र. ६ आणि वि. स. खांडेकर विद्यालय या दोन शाळांना आमदार निरंजन डावखरे यांच्या स्थानिक विकास निधीतून संगणक संच उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या संगणकांचे अधिकृत लोकार्पण सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. ​नगरसेविका श्रीमती दिपाली भालेकर आणि दिलीप भालेकर यांच्या विशेष पाठपुराव्यातून हा निधी मंजूर करण्यात आला होता. भटवाडी येथील जि.प. शाळा क्र. ६ ला आयोजित कार्यक्रमात पालकमंत्र्यांच्या हस्ते हा संगणक शाळेला सुपूर्द करण्यात आला. ​या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणकीय शिक्षण मिळण्यास मदत होणार आहे. आपल्या प्रभागातील शाळांच्या शैक्षणिक गरजा ओळखून भालेकर यांनी केलेल्या या प्रयत्नांचे पालकमंत्र्यांनी कौतुक केले. या प्रसंगी शाळेचे शिक्षक, पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg