loader
Breaking News
Breaking News
Foto

सिलेंडर नाही...खानावळीना चूलीचा आधार

अलिबाग (महेश पोरे) - चुली वरच्या जेवणाची चवच भारी....असे अनेकवार अनेकांच्या तोंडून निघणारे शब्द ..आज प्रत्यक्षात उतरले आहेत आणि तेही शहरातील हॉटेल आणि खानावळीमध्ये हा चुली वरच्या जेवणाचा आस्वाद घेता येत आहे. निम्मित आहे ते सिलेंडर टंचाईचे..! गेली अनेक दिवस सुरू असलेल्या इराण..अमेरिका... युद्धाच्या झळा भारतीयांना सोसाव्या लागत आहेत. विशेषतः पेट्रोल, सिलेंडर गॅसच्या वितरणावर त्याचा गंभीर परिमाण झाला आहे. हॉटेल व्यावसायिक मेटाकुटीला आला आहे. व्यावसायिक सिलेंडर मिळत नसल्याने अनेक हॉटेल, खानावळी आठ दिवसातून चार दिवसच धंदा करतात.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अलिबाग हे पर्यटकांचे आवडीचे ठिकाण आहे. तसेच जिल्ह्याचे मुख्यालय म्हणून ओळखले जाणारे शहर आहे. सर्वच शासकीय कार्यालय, जिल्हा न्यायालय, अलिबाग मध्ये असल्याने हजारो लोकांचे अलिबागेत येणे जाणे अलिबागेत असते. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांच्या पोटाची भूक भागवण्यासाठी, त्याच्या राहण्यासाठी हॉटेल, खानावळी, रिसॉर्ट याची देखील कमतरता नाही. पण, आज सिलिंडरच्या कमतरते मुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. सिलेंडर गॅसची उणीव भरून काढण्यासाठी हॉटेल व्यावसायिक स्टोव्ह, आणि चुलीचा वापर करीत आहेत.

टाईम्स स्पेशल

गॅसच्या तुलनेत चुलीचा वापर करताना वेळ अधिक होतो, पण त्याशिवाय पर्याय नाही, गॅस सिलेंडर संपल्याने चूल तयार करावी लागली, इतक्या वर्षाच्या हॉटेल व्यवसायाचा अनुभवात प्रथमच हा मार्ग अवलंबून जेवण तयार करण्यात येत आहे, असे हॉटेल नित्यानंद चे अर्चित बंगेरा यांनी सांगितले. सिलेंडर नसल्याने हॉटेल व्यावसायिक मेटाकुटीला आला आहे. शहरातील अन्य हॉटेल व्यावसायिक देखील चूल आणि स्टोव वर पदार्थ बनवीत आहेत. अगदी वडापावची गाडी चालविणारा देखील चुलीवरचा वडा...म्हणून ग्राहकांना आकर्षित करीत आहे. "चुलीवरच्या जेवणाची चव लय भारी" ...याचा अनुभव आता लोक वारंवार घेत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg