loader
Breaking News
Breaking News
Foto

बांदा येथे हनुमान जयंती उत्सव, बुधवारपासून विविध कार्यक्रम

बांदा (प्रतिनिधी) - बांदा उभाबाजार येथील प्रसिध्द श्री दक्षिणाभिमुखी हनुमान मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही हनुमान जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. उत्सवाच्या पुर्वसंध्येला बुधवार दि. १ एप्रिल रोजी रात्रौ ठिक ७.३० वाजता स्थानिकांच्या पारंपरिक वार्षिक भजनसेवेने उत्सवाचा आरंभ होईल. बुधवारी रात्री १०.०० वा. चेंदवणकर गोरे दशावतार नाट्यमंडळ, कवठी यांचा 'शौरी भीषण' हा पौराणिक नाट्यप्रयोग सादर होईल.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गुरूवार दि. २ एप्रिल रोजी हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी ठीक ६.०० वाजता श्री हनुमान जन्म सोहळा होऊन पारंपारिक श्री हनुमान फेरीला आरंभ होईल. सायं. ठीक ४.००वा. श्री रामनाम जप होणार आहे. यात भाविकांनी सहभाग घ्यावा. सायं. ठीक ५ ते ६.०० वा. श्री विठ्ठल सोहिरा महिला भजनसेवा मंडळ, बांदा यांची भजनसेवा होईल. सायं. ठीक ७.३० वा. प्रसिध्द कीर्तनकार ह.भ.प. कैलास खरे, रत्नागिरी यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. सर्व भाविकांनी याचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन श्री हनुमान सेवक मंडळ, बांदा आणि सिद्धेश विनोद शिरोडकर, बांदा यांच्यावतीने करण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg