loader
Breaking News
Breaking News
Foto

बेनी बुद्रुक येथील २२ वर्षीय तरुणाची गळफास घेत आत्महत्या

लांजा (वार्ताहर) - एका २२ वर्षीय तरुणाने नायलॉन दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना लांजा तालुक्यातील बेनी बुद्रुक चिंचवाडी येथे सोमवारी ३० मार्च रोजी सकाळी घडली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबतची खबर सुरेश गणू गितये (५१ वर्षे, रा. बेनी बुद्रुक चिंचवाडी) यांनी लांजा पोलीस ठाण्यात दिली. विश्वास सुरेश गितये (२२ वर्षे) याने सोमवार दि. ३० मार्च रोजी सकाळी ९.३० ते ९.४५ च्या मुदतीत घरात कोणी नसताना घरातील रूममध्ये लाकडी वाशाला नायलॉन दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड. कॉन्स्टे. नासिर नावळेकर हे करत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg