पनवेल :- शहर परिसरात घरफोडी करणार्या 5 जणांच्या टोळीपैकी तिघा जणांना गुन्हे शाखा कक्ष 3 च्या पथकाने ताब्यात घेतले असून त्यांच्या अटकेमुळे पनवेल परिसरातील घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
पनवेल शहर परिसरात घरफोडी झाल्याच्या घटनांच्या तक्रारी पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये प्रामुख्याने कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांचे राहते घराच्या सामानाचे खोलीची खिडकी उचकटून त्या वाटे घरामध्ये प्रवेश करून घरातील लाकडी कपाटाचे दरवाजे उचकटून व लाकडी बेड मध्ये ठेवलेले 40,00,000/- रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम घरफोडी चोरी करून नेल्याने वरील प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घरफोडींचा समांतर तपास गुन्हे शाखा कक्ष 3 चे वपोनि अविनाश काळदाते यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि पवन नांद्रे, पोउपनि अभयसिंह शिंदे, पो.हवा.दिपक डोंगरे, सागर रसाळ, अजिनाथ फुंदे, लवकुश शिंगाडे, प्रसाद घरत आदींच्या पथकाने सदर आरोपींचा शोध सुरू केला असता सदर गुन्हयाचा केलेल्या तपासात घटनास्थळच्या आजूबाजूचे सीासीटीव्ही फुटेज तपासले असता नमूद गुन्ह्यात एकूण पाच आरोपींचा सहभाग असल्याचे दिसून आले. सदर गुन्ह्याचे तांत्रिक तपासात गुन्ह्यातील तीन आरोपींना भाईंदर परिसरातून ताब्यात घेऊन त्यामध्ये ललित शाही (33), किशोर शाही (29), शेर शाही (35) यांना ताब्यात घेतले असता त्यांनी त्यांचे सहकारी पाहिजे आरोपी भरत यादव व विष्णु शाही यांचे सह केले असल्याचे कबूल केले. त्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.




















































































1.jpg)













.jpg)




























































.jpeg)





































































































































































































































































.jpg)























































































.jpg)





























.jpg)


































































































































































































































































































































.jpg)































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.