loader
Breaking News
Breaking News
Foto

करीरोड येथे भजन क्षेत्रातील त्रिमूर्तींचा अमृत महोत्सवी जन्मदिन सोहळा..!

मुंबई (वार्ताहर) : महाराष्ट्राच्या भजन परंपरेला मोठया उंचीवर नेणारे भजन सम्राट भगवान लोकरे बुवा, भजन सम्राट श्रीधर मुणगेकर बुवा आणि भजन सम्राट रामदास कासले बुवा या त्रिमूर्तीचा अमृत महोत्सवी (७५ वा) जन्मदिन सोहळा यावर्षी मुंबईत साजरा होत आहे. त्यांच्या भजन, अभंग, गौळण, भारुड, कव्वाली आणि आधुनिक भजन शैलीतील उल्लेखनीय योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रविवार दिनांक १२ एप्रिल २०२६ रोजी, श्रमिक जिमखाना, करी रोड येथे एका भव्य नागरी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या गुरुवर्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यभर भजनकलेद्वारे समस्त भजनप्रेमी तसेच मुख्यत्वे कोकणवासियांच्या मनावर अधिराज्य गाजवून समाजप्रबोधनाचे कार्य केले असून, हजारो शिष्य घडवून ही परंपरा कायम ठेवली आहे. त्यांचे काम महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा अमूल्य ठेवा आहे. तीनही गुरुवर्यांचा एकत्रित अमृत महोत्सवी जन्मदिन साजरा करण्याचा हा ऐतिहासिक सुवर्णक्षण आहे. ज्या गिरणगावात पूर्वी डबलबारी भजनांचे मोठमोठे कार्यक्रम व्हायचे. अगदी पुलाजी बुवा, वरळीकर बुवांपासुन, वामन खोपकर बुवा, स्नेहल भाटकर, कोकणकला भुषण चंद्रकांत कदम बुवा, भजनसम्राट परशुरामबुवा पांचाळ आणि संगितरत्न विलासबुवा पाटील यांच्यापर्यंत... त्याच लालबाग, परळ, करीरोड भागात हा कार्यक्रम होत असल्याने भजनरसिकांमध्ये उत्साह संचारला आहे.

टाइम्स स्पेशल

सर्व भजनरसिकांनी या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्याचे आवाहन अध्यक्ष प्रमोद हर्याण बुवा ९८१९० ५६७०७, सचिव विशाल मसुरकर. ९१५८९ ८६८४८, खजिनदार संजय पवार ९०७६१ ६०४७५, कार्याध्यक्ष राजेंद्र नाडणकर ९८३३४५५२६२ व अमृत महोत्सव जन्मदिन सोहळा समिती आणि सर्व शिष्यगण यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg