loader
Breaking News
Breaking News
Foto

ठाणे सिव्हिल रुग्णालयाने टाकली कात; प्रशासनाचा स्वच्छतेवर विशेष भर

​ठाणे (प्रतिनिधी) - ठाणे जिल्ह्यातील हजारो रुग्णांचे आधारकेंद्र असलेल्या ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाने (सिव्हिल रुग्णालय) आता कात टाकण्यास सुरुवात केली आहे. रुग्णालयातील स्वच्छता, शिस्त आणि रुग्णसेवेच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा झाल्याचे सकारात्मक आज पाहायला मिळाले रुग्णालयातील विविध वॉर्ड, बाह्यरुग्ण विभाग (OPD) आणि संपूर्ण परिसर अधिक स्वच्छ व नीटनेटका ठेवण्यावर प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित केले असून, रुग्णांना दर्जेदार आरोग्यसेवा देण्यासाठी संपूर्ण यंत्रणा सक्रिय झाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आज रुग्णालयाच्या कामकाजाचा आणि सुविधांचा आढावा घेण्यासाठी प्रशासकीय वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून विशेष पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता. या दौऱ्यात ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष पांचाळ, आरोग्य उपसंचालक डॉ. अशोक नांदापूरकर आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धीरज महांगडे यांनी रुग्णालयातील प्रत्येक विभागाला भेट देऊन कामकाजाची बारकाईने माहिती घेतली. यावेळी रुग्णांच्या उपचार पद्धती, उपलब्ध औषधसाठा, स्वच्छता यंत्रणा आणि उपस्थित कर्मचाऱ्यांची कार्यपद्धती यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी वरिष्ठ सर्जन निशिकांत रोकडे, डॉ. महेंद्र केंद्रे विनोद जोशी आदी उपस्थित होते. ​रुग्णांच्या देखभालीमध्ये अधिक सुधारणा करण्यासाठी वैद्यकीय आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांकडून सध्या विशेष दक्षता घेतली जात आहे. मात्र, ही सेवा अधिक लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी पाहणी दरम्यान उपस्थित मान्यवरांनी काही महत्त्वाचे तांत्रिक आणि प्रशासकीय बदल सुचवले आहेत. रुग्णांना केसपेपर काढण्यापासून ते प्रत्यक्ष उपचार मिळेपर्यंत कुठेही ताटकळत राहावे लागू नये, तसेच आपत्कालीन परिस्थितीत त्यांना तात्काळ मदत मिळावी, सुलभ उपाययोजना राबवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

टाइम्स स्पेशल

​यासोबतच, रुग्णालय परिसरात कायमस्वरूपी स्वच्छता राखण्यासाठी 'क्लीनलीनेस मॉनिटरिंग सिस्टीम' (नियमित देखरेख), नियमित स्वच्छता मोहीम आणि कर्मचारी यांच्यातील योग्य समन्वयावर अधिक भर दिला जात आहे. जिल्हा रुग्णालयाची आरोग्यसेवा अधिक सक्षम, पारदर्शक आणि परिणामकारक करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने उचललेली ही पावले अत्यंत महत्त्वाची मानली जात आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

जिल्हाधिकाऱ्यांच्या पाहणी दौऱ्यानंतर यंत्रणा 'ऍक्शन मोड'वर

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg