साडवली (ता. देवरुख) - येथील अप्लाइड इन्व्हायर्नमेंटल रिसर्च फाउंडेशन (AERF) फील्ड स्टेशन येथे 'निसर्गपूरक शेती प्रोत्साहन कार्यक्रम' अंतर्गत पारंपरिक शेती पद्धती व शाश्वत जमीन व्यवस्थापनावर आधारित व्याख्यानमाला आणि समृद्ध प्रदर्शन यशस्वीरीत्या पार पडले. या कार्यक्रमास सुमारे ३०० जणांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. तसेच AERF च्या भीमाशंकर व तळमाची येथील टीमचे सदस्य आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कार्यक्रमादरम्यान AERF, पुणे यांच्या संचालिका श्रीमती अर्चना गोडबोले, टेक्नोग्रीन सोल्युशन लिमिटेडचे संचालक विनायक केळकर, महाराष्ट्र शासनाचा 'शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार' विजेते गिरीश बोंद्रे, मंजुला पाटील व नेहा माने यांनी आपल्या अनुभवांवर आधारित मार्गदर्शन करत मोलाची माहिती दिली. याचबरोबर उपस्थित शेतकऱ्यांनीही पर्यावरणपूरक शेती पद्धतींबाबतचे आपले अनुभव मांडून कार्यक्रम अधिक समृद्ध केला. प्रदर्शनामध्ये विविध प्रकारची बियाणे आकर्षक पद्धतीने मांडण्यात आली होती. तसेच निसर्गपूरक शेतीतील विविध तंत्रज्ञान, सेंद्रिय खते आणि नाविन्यपूर्ण शेती पद्धतींचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले, ज्यामुळे उपस्थितांना उपयुक्त व मार्गदर्शक माहिती मिळाली.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून निसर्गपूरक शेतीच्या संकल्पनेचे प्रभावी दर्शन घडले असून, शेतकऱ्यांमध्ये ज्ञानाची देवाणघेवाण घडवून आणण्यासाठी हे व्यासपीठ महत्त्वपूर्ण ठरले. यावेळी AERF, पुणे यांच्या संचालिका अर्चना गोडबोले, साडवली रिसर्च स्टेशनचे समन्वयक गुणवंत महाजन तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते.






























































































































































.jpg)























































































.jpg)





























.jpg)
































































































































































































































































































































.jpg)

















95.jpg)






3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.