रत्नागिरी : रत्नागिरी नगर पालिकेच्या स्थापनेला १५० वर्षे पूर्ण झाले. या ऐतिहासिक टप्प्याचे औचित्य साधून शहरात वर्षभर विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि विकासकामांचा महोत्सव साजरा केला जाणार आहे. उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, मुख्याधिकारी वैभव गारवे आणि ३२ सदस्यांच्या टीमला या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होण्याचे भाग्य लाभले असून, यानिमित्त रत्नागिरी शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा आमचा निर्धार आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी दिली. पालिकेत आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी नगसवक सौंरभ मलुष्टे, बाळू साळवी, राजू कीर, विलणकर, बंटी कीर, प्रिती सुर्वे, निमेश नायर, केतन शेट्ये, भाजपचे सचिन करमरकर आदी उपस्थित होते.
शिल्पा सुर्वे म्हणाल्या, १८७४ सालापासूनचा समृद्ध इतिहास असलेल्या रत्नागिरी पालिकेने अनेक लोकनेते आणि अनुभवी सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगती केली आहे. आता दीडशेव्या वर्षात पदार्पण करताना केवळ एक दिवस उत्सव साजरा न करता, संपूर्ण वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शहराचा सांस्कृतिक इतिहास उलगडणारे उपक्रम, सुशोभीकरण आणि नागरी सुविधांच्या सक्षमीकरणावर भर दिला जाणार आहे. रत्नागिरीला महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचे शहर बनवण्याचे स्वप्न राज्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पाहिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दोन वर्षांत शहरात अभूतपूर्व प्रगती झाली आहे. शिवसृष्टी, लेझर शो आणि तारांगण यांसारख्या प्रकल्पांमुळे पर्यटकांचा ओघ वाढला आहे. रत्नागिरी आता शैक्षणिक हब झाले आहे. सध्या शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत सर्वत्र कामे सुरू असून, येत्या ५-६ महिन्यांत रत्नागिरीकरांना एक देखणे आणि सुविधासंपन्न शहर पाहायला मिळणार आहे.
१५० व्या वर्षानिमित्त आयोजित होणाऱ्या सप्ताहात आणि वर्षभरात उपक्रम राबवले जाणार आहेत. महिला आणि बालकांसाठी विशेष कल्याणकारी योजना व कार्यक्रम असणार आहेत, मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन, प्रमुख चौक, रस्ते आणि ऐतिहासिक स्थळांचे नूतनीकरण व रोषणाई केली जाणार आहे, रत्नागिरीचा समृद्ध वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध सांस्कृतिक स्पर्धा व प्रदर्शने भरवले जाणार आहे. आम्ही सर्व ३२ सदस्य अतिशय भाग्यवान आहोत की आमच्या कार्यकाळात नगर परिषदेला १५० वर्षे पूर्ण होत आहेत. पालकमंत्र्यांच्या सहकार्याने आम्ही रत्नागिरीला महाराष्ट्रातील सर्वोत्तम शहर बनवण्यासाठी कटिबद्ध आहोत," असे मत यावेळी नगराध्यक्षा शिल्पा सूर्वे यांनी व्यक्त केले.




























1.jpg)













.jpg)




























































.jpeg)





































































































































































































































































.jpg)























































































.jpg)





























.jpg)


































































































































































































































































































































.jpg)


























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.