loader
Breaking News
Breaking News
Foto

डाॅ.माया तिरमारे यांना युनाय फाऊंडेशन कडून पुरस्काराने सन्मानित

केळंबे-लांजा(सिराज नेवरेकर) - जागतिक महिला दिनानिमित्त लांजातील डाॅक्टर माया मनोहर तिरमारे यांना युनाय फाऊंडेशनच्या वतीने एमएच वुमन एक्सिलेन्स 2026 पुरस्काराने पुणे येथे समारंभामध्ये सन्मानित करण्यात आले. डाॅ.माया तिरमारे यांचे वैद्यकीय क्षेत्रात, सामाजिक कार्यात असलेले योगदान पहावून त्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

महाराष्ट्रातील कर्तृत्ववान महिलांचा गौरव सोहळा पुणे येथिल लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह येथे नुकताच पार पडला. यावेळी डाॅ.माया तिरमारे यांना पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला महापौर मंजुषा दीपक नागपुरे, पोलीस उपायुक्त रुक्मिणीताई गलांडे, युनाय फाऊंडेशनच्या अध्यक्षा मायाश्री गायकवाड, विमेन सेल पुणे मिरर च्या संचालिका शितल बियानी, ॲड. अदिती निटुरे आदी मान्यवर उपस्थित होते. तिरमारे यांना पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg