रत्नागिरी: जागतिक स्तरावर युद्धाचे ढग जसजसे गडद होत आहेत, तसे त्याचे भीषण पडसाद आता थेट कोकणच्या जीवनवाहिनीवर उमटू लागले आहेत. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम रत्नागिरी जिल्ह्यात युद्धपातळीवर सुरू असतानाच, आता आंतरराष्ट्रीय स्तरावरील युद्धजन्य परिस्थितीमुळे या कामाला 'ब्रेक' लागण्याची चिन्हे दिसत आहेत. विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यातील 'हरवली ते काटे' आणि 'काटे ते वाकेड' या दोन अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यांच्या कामावर डिझेल आणि व्यावसायिक गॅसच्या तुटवड्याचा मोठा परिणाम झाला असून, विकासकामांची गती कमालीची मंदावली आहे.
या महामार्गाच्या कामाचे गणित पूर्णपणे इंधनावर अवलंबून आहे. काटे-वाकेड या टप्प्याचे काम पाहणाऱ्या ईगल कंपनीला आपल्या प्लांटवरील अवजड मशनरी चालवण्यासाठी दररोज सुमारे १० हजार लिटर डिझेलची आवश्यकता भासते. दुसरीकडे, हरवली-काटे या मार्गावरील कामासाठी दिवसभरात किमान ७ हजार लिटर डिझेल लागते. मात्र, सध्याच्या अनिश्चित परिस्थितीमुळे इंधनाचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. या कंपन्या रत्नागिरीतील स्थानिक पंपांवरून डिझेलचा साठा करत होत्या, परंतु आता पंप चालकांकडेच मर्यादित साठा उपलब्ध असल्याने त्यांना आवश्यक तेवढे डिझेल मिळेनासे झाले आहे. परिणामी, कंपन्यांना आता इतर लांबच्या मार्गांनी डिझेल आणण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. यात वेळ आणि पैसा दोन्ही मोठ्या प्रमाणात खर्च होत असल्याने प्रकल्पाचा खर्च वाढत आहे आणि कामाचे वेळापत्रक कोलमडत आहे.






























.jpeg)





































































































































































































































































.jpg)























































































.jpg)





























.jpg)


































































































































































































































































































































.jpg)

























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.