loader
Breaking News
Breaking News
Foto

शिवकर गावात ‘ग्रीन रिवाईव्हल पार्क’ चा शुभारंभ

पनवेल - तालुक्यातील शिवकर गावात ‘ग्रीन रिवाईव्हल पार्क’ या महत्त्वपूर्ण पर्यावरणपूरक उपक्रमाचा शुभारंभ आणि हस्तांतरण सोहळा उत्साहात पार पडला. ह्युंदाई मोबिस, महाराष्ट्र शासन आणि वर्ल्ड व्हिजन इंडियाच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प राबविण्यात आला आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे शहरी भागात हरित क्षेत्र वाढवणे, पर्यावरणाचा समतोल राखणे आणि नागरिकांसाठी स्वच्छ व आरोग्यदायी सार्वजनिक जागा निर्माण करणे. वाढते प्रदूषण, कमी होत चाललेली झाडे आणि बदलते हवामान यामुळे अशा प्रकल्पांची गरज अधिक जाणवू लागली आहे. त्यासाठीच १ ते २ एकर जागेवर नैसर्गिक, शाश्वत आणि समृद्ध हरित परिसंस्था उभारण्याचा हा प्रयत्न आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रायगडमधील या उद्यानात सुमारे १२,००० देशी झाडे आणि झुडपे लावण्यात आली आहेत. त्यामुळे परिसरातील हरित आच्छादन वाढले असून हवेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होणार आहे. या पार्कमध्ये फिरण्यासाठी पायवाटा, हिरवे लॉन, तलाव, विश्रांतीसाठी बाक, कचरा व्यवस्थापन सुविधा आणि सौर दिवे यांसारख्या सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, हा संपूर्ण परिसर प्लास्टिकमुक्त घोषित करण्यात आला आहे. या प्रकल्पात स्थानिक समुदायाचा मोठा सहभाग दिसून आला. १० हून अधिक शाळांतील विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण आणि पर्यावरण जनजागृती उपक्रमात सहभाग घेतला. त्यामुळे तरुणांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण झाली आहे.

टाईम्स स्पेशल

हा उपक्रम पनवेल विधानसभेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, रायगडचे डेपो हेड सत्यजित भिटे, BDO समीर वाठारकर पनवेल पंचायत समितीच्या उपसभापती भुपेंद्र पाटील, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे, मोबिस इंडिया लिमिटेड यांच्यासह इतर शासकीय आणि ह्युंदाई मोबिसच्या अधिकाऱ्यांच्या आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत पार पडला. ‘ग्रीन रिवाईव्हल पार्क’ हा उपक्रम पर्यावरण संवर्धनासोबतच नागरिकांना निसर्गाशी जोडणारा एक महत्त्वाचा प्रयत्न आहे. सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून उभारलेला हा प्रकल्प भविष्यात अधिक हरित, स्वच्छ आणि शाश्वत समाज घडविण्यास हातभार लावणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg