loader
Breaking News
Breaking News
Foto

फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उदघाटन

रत्नागिरी - श्रमिक किसान सेवा समिती संचालित रत्नागिरी लोकनेते शामरावजी पेजे कला वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ व वरिष्ठ महाविदयालय, श्रमिक विद्यालय व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले इंग्लिश मेडीयम स्कुल शिवार आंबेरे येथे फिनोलेक्स पाईप अँड फिटिंग CSR पार्टनर मुकुल माधव फाउंडेशन यांच्या फंडातून सुसज्ज स्वच्छता गृह उभारले गेले, त्याचा उदघाटन समारंभ आज सोमवार दिनांक 30 मार्च 2026 या दिवशी झाला. आजच्याच दिवशी फिनोलेक्स इंडस्ट्रीला 45 वर्ष पूर्ण होत असून याच शुभमुहूर्तावर माननीय रामबाबू संका (टेकनिकल डायरेक्टर), सागर चिवटे (फॅक्टरी मॅनेजर), अमित घोरपडे (सिव्हिल डिपार्टमेंट) अभिषेक साळवी सर सर्व फिनोलेक्स इंडस्ट्री, यास्मिन शेख (मुकुल माधव फाउंडेशन पुणे) संस्थेचे अध्यक्ष सुरेश भायजे, ऍड. महेंद्र मांडवकर (जि. प. सदस्य पावस) यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या सोहळ्याच्या उदघाटन प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना रामबाबू संका यांनी या विद्यासंकुलाच्या उत्तरोत्तर भरभराटीसाठी व मदतीसाठी तत्पर राहू असे आश्वासन दिले.तसेच स्वच्छतेचे महत्व विषद केले.त्याचप्रमाणे महेंद्र मांडवकर यांनीदेखील संस्थेच्या पाठीमागे राहू असे आश्वासन दिले. तसेच चिवटे यांनी देखील मदतीचे आणि सहकार्याचे आश्वासन दिले. संस्थेचे अध्यक्ष सुरेश भायजे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सर्वांना धन्यवाद दिले तसेच आपण या संस्थेला नेहमी सहकार्य कराल अशील अपेक्षा व्यक्त केली.

टाईम्स स्पेशल

या कार्यक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष नारायण आग्रे, सचिव राजस मोहीते तसेच सहसचिव विजय मोहीते, सहसचिव अविनाध डोर्लेकर, कोषध्यक्ष विश्वनाथ खानविलकर, दयानंद मोहीते, शिवार आंबेरे सरपंच राजन रोकडे, गावडे आंबेरे सरपंच लक्ष्मण सारंग, भरत नाटेकर, ओंकार भेकरे, रोकडे गुरुजी, दिवाकर कदम, लांबे, रविंद्र लाखण, दयानंद लाखण, सूर्यकांत पेजे, अंनत पेजे, सुधाकर पेजे आदी मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मधुकर थुळ यांनी मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कल्पना मेस्त्री आणि आभार प्रदर्शन प्रा. अमित पवार यांनी व्यक्त करून कार्यक्रमांची यशस्वी सांगता केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg