loader
Breaking News
Breaking News
Foto

ठाण्यात पाचपाखाडी भागात पेट्रोल पंप जवळ भर रस्त्यावर गोळीबार

ठाणे (प्रतिनिधी) : ठाणे पोलिस आयुक्तालयात मुंब्रा येथील कौसा येथे २० दिवसांपूर्वीच नदीम खान उर्फ बाबा खान या युट्यूबरच्या दिशेने पाच गोळ्या झाडल्याची घटना ताजी असतानाच. ठाण्यातील पाचपाखाडी भागात भर रस्त्यात गोळीबार झाल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास उघडकीस आला. या घटनेत संशयित आरोपी जबीउल्ला खान (३७) याच्याकडून दोन गोळ्या एका तरुणाच्या दिशेने झाडण्यात आल्या. या घटनेने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले. भररस्त्यात गोळीबार होत असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ठाण्यात हायवे पूर्व द्रुतगती महामार्गालगतच्या पाचपाखाडी येथील हरितपथ परिसरात शेल कंपनीचे पेट्रोल पंप आहे. या पंपवर तक्रारदार इंजमाम हा त्याच्या मैत्रीणीसोबत दुचाकीमध्ये पेट्रोल पंपवर पेट्रोल भरण्यासाठी जात होता. परंतु पेट्रोल पंपवर इंधन नसल्याने तो पुन्हा सेवा रस्त्याच्या दिशेने निघाला. त्याचवेळी जबीउल्ला खान हा देखील तेथे होता. त्याने इंजमाम याच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या. त्यानंतर तेथून जबीउल्ला पळून गेला. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. इंजमाम आणि जबीउल्ला दोघेही ठाण्यातील हाजुरी भागात वास्तव्यास आहेत. जबीउल्ला खान आणि इंजमाम याचे यापूर्वी वाद होते. त्यामुळे पूर्व वैमन्यस्यातून हे कृत्य केल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर येत आहे.

टाईम्स स्पेशल

जबीउल्ला याच्याविरोधात यापूर्वी अनेक गुन्हा दाखल असून तो अभिलेखावरील गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले. सीसीटीव्ही चित्रीकरण तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु असल्याचे नौपाडा पोलिसांनी सांगितले. घटनेत कोणीही जखमी झाले नसून आरोपीचा शोध सुरु असल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg