रसायनी (राकेश खराडे) - खाने आंबिवली थांब्यासमोर बिपिसीएल प्रकल्प तसेच रस्त्याला लागून दुकाने, हाॅटेल तसेच जवळपास स्टेट बँक ऑफ इंडिया रसायनी शाखा, पिल्लई एज्युकेशन कॅम्पस रसायनी असल्याने गेल्या महिन्याभरात तेरा ते पंधरा अपघात होऊन काहींना आपले हात, पाय आदी शरीराचे भाग अपघातात गमवावे लागले आहेत. तसेच येथील पिल्लई एज्युकेशन कॅम्पस, स्टेट बँक ऑफ इंडिया समोर रस्त्यावरील असलेले दोन गतिरोधक रस्त्याच्या कामात काढल्याने अपघातांना आमंत्रण मिळत आहे. शिवाय पिल्लई कॅम्पसमध्ये सहा ते सात हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून याच रस्त्यावरुन रहदारी सुरू असते. एका महिन्याभरात या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढत असल्यामुळे पालकांच्या मनात आपल्या पाल्यांविषयी भीती निर्माण होत आहे.
या मार्गावरून पाताळगंगा औद्योगिक क्षेत्राकडे जाणा-या वाहनांची रहदारी सुरुच असते. यावेळी दांडमार्गे येणारी वाहने खाने आंबिवली या चढ उताराचा रस्त्यावरून चढण चढताना तसेच उतरताना याचवेळी खाने आंबिवली गावातून येणारी वाहने तसेच गावात प्रवेश करणारी वाहने रस्त्यावर येताच दिसेनासे होत असल्याने शिवाय भरधाव वाहनांच्या गतीवर नियंत्रण येत नसल्याने अपघातांची मालिका सुरूच आहे. या वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी गतिरोधकाची आवश्यकता आहे. या रस्त्यावर अवजड वाहने मोठ्या प्रमाणात रेलचेल असल्यामुळे अपघाताची समस्या गंभीर होत आहे. खाने आंबिवली थांब्यासमोर हरि गोपाळे, जयराम गोपाळे, मंगेश सखाराम खाने, रामू जितेंद्र खाने, राजेंद्र यांचा वाहनाला गेल्या आठवड्यात अपघात होऊन कोणाचा हात तर कोणाला आपला पाय गमवावा लागला आहे. तर अपघातात काहींनी जीवही गमावला आहे.
दरम्यान खाने आंबिवली जवळ गतीरोधक त्याच बरोबर वाहनांची गती कमी करण्याचे फलक लावण्याची खाने आंबिवली ग्रामस्थांसह रसायनी कर तसेच प्रवासीवर्गांतून होत आहे. तरी खाने आंबिवली थांब्यासमोर सार्वजनिक बांधकाम विभागाने गतिरोधक न लावल्यास नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
















































































































































































































.jpg)























































































.jpg)





























.jpg)


































































































































































































































































































































.jpg)

























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.