loader
Breaking News
Breaking News
Foto

कबड्डी खेळाडूंना स्पोर्ट्स किट्सचे वाटप

पनवेल - महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या अनुषंगाने रायगड जिल्हा पुरुष व महिला कबड्डी संघातील प्रत्येक खेळाडूला रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने संपूर्ण स्पोर्ट्स किट्स प्रदान करण्यात आले. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्यावतीने हा उपक्रम राबविण्यात आला. खेळाडूंना दर्जेदार क्रीडा साहित्य उपलब्ध करून देत त्यांच्या तयारीस चालना देण्याचा या उपक्रमाचा उद्देश होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम, छत्रपती पुरस्कार विजेते सूर्यकांत ठाकूर, संघ व्यवस्थापक प्रमोद म्हात्रे, क्रीडा प्रशिक्षक विनोद नाईक तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. या उपक्रमामुळे खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी स्पर्धेसाठी त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होणार आहे. दिनांक २ एप्रिल ते ६ एप्रिल २०२६ दरम्यान सिन्नर (जि. नाशिक) येथे होणाऱ्या राज्यस्तरीय अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेसाठी रायगड जिल्हा पुरुष व महिला कबड्डी संघ दिनांक १ एप्रिल रोजी सिन्नर, नाशिक येथे रवाना होणार आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg