संगलट खेड (प्रतिनिधी) - अहिंसेची शिकवण देणारे जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती दापोली शहरात अत्यंत उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्त शहरातील जैन समाज बांधवांच्या वतीने विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. उत्सवाची सुरुवात पहाटे भगवान महावीरांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. त्यानंतर शहरातील मुख्य मार्गावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली. "अहिंसा के अवतार भगवान महावीर स्वामी की जय", "अहिंसा परमो धर्म" अशा घोषणांनी दापोली शहर दुमदुमून गेले होते. मिरवणुकीत पारंपारिक वेशभूषेतील महिला, पुरुष आणि लहान मुलांचा सहभाग लक्षणीय होता.
जैन मंदिर कोकंबाआळी येथे भगवान महावीरांच्या मूर्तीचे पुजनाद्वारे करण्यात आले. यावेळी उपस्थित भाविकांनी सामूहिक मंगलपाठ घेऊन शोभायात्रेला सुरुवात केली. भगवान महावीरांनी दिलेला 'जगा आणि जगू द्या' हा संदेश आजच्या काळात किती महत्त्वाचा आहे हा संदेश आजच्या काळात किती महत्वाचा यांचा प्रात्यक्षिक रिदम, सम्यक, केविन जैन यांनी जैन साधुच्या पोशाख परिधान करुन दाखवली. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेणाऱ्यांचा सत्कार अध्यक्ष हसमुखभाई जैन, मंत्री-मनोहर जैन खजिनदार मनोहर जैन, महिला अध्यक्ष प्रिती जैन, व सचिव अनिता जैन यांचे हस्ते देऊन गौरविण्यात आले. संपुर्ण कार्यक्रमाचे नियोजन, मंदिरात सजावट नियती, संयम भळगट, खुषी, देव, वंश, आकाश, हितेश,यश, आदेश, निशिता, रिदम, सम्यक, केविन, मयंक, निराली इत्यादी जैन नवयुवकांनी केली.











1.jpg)













.jpg)




























































.jpeg)





































































































































































































































































.jpg)























































































.jpg)





























.jpg)


































































































































































































































































































































.jpg)


























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.