loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा कुक्कुट पालन परिसरात आढळला मृतावस्थेतील बिबट्या

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - लांजा शहरातील कुक्कुट पालन नजीक बिबट्या कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मृत बिबट्याची विल्हेवाट लावण्यात आल्याचे वनपाल लांजा डी.आर. कोळेकर यांनी सांगितले. लांजा कुक्कुट पालन परीसरात बिबट्या कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याची माहीती कुक्कुट पालन संस्थेचे संचालक प्रविण जेधे यांनी सकाळी ९ ३० वाजता लांजा वनपाल यांना दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

लांजाचे वनपाल डी. आर. कोळेकर यांनी आपल्या सहकार्‍यांसह घटनास्थळी जाऊन पहाणी केली असता बिबट्या कुजलेल्या अवस्थेत दिसून आला. सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन अधिकारी डॉ.सुहासकुमार गोपाळराव अनुचे यांनी तपासणी केल्यानंतर बिबट्याच्या डोक्याला व कमरेला गंभीर दुखापत झाली असुन अज्ञात वाहनाची धडक बसल्यामुळे बिबट्या अंदाजे दोन दीवसापुर्वी मृत झाला असावा, असे सांगण्यात आले. बिबट्या सात महिन्याचा मादी जातीचा आहे.

टाईम्स स्पेशल

विभागीय वनअधिकारी गिरिजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक प्रियांका लगड, वनक्षेत्रपाल प्रकाश सुतार, यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय तालुका डॉ.सुहासकुमार गोपाळराव अनुचे यांनी शवविच्छेदन केल्यानंतर पंचयादी करून बिबट्याची विल्हेवाट लावण्यात आली. ही कार्यवाही लांजाचे वनपाल आर.डी.कोळेकर, वनरक्षक नमिता कांबळे, रेस्क्यू टीम सदस्य अमित लांजेकर यांनी पुर्ण केली. अशा प्रकारच्या घटना घडल्यास टोल फ्री क्रमांक १२२६,किंवा ९४२१७४१३३५ या नंबर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg