सावंतवाडी (प्रतिनिधी) - श्रीराम वाचन मंदिर व क्रीडा भुवन सावंतवाडी आणि सावंतवाडी सहकारी पतपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य सैनिक जयानंद मठकर व्याख्यानमाला २०२६ मंगळवार ७ एप्रिल ते शनिवार ११ एप्रिल या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. व्याख्यानमालेचे यंदाचे २२ वे वर्ष असून यापूर्वी ही व्याख्यानमाला प्रभाकरपंत कोरगावकर यांच्या नावे सुरू होती. श्रीराम वाचन मंदिर सभागृहात रोज सायंकाळी सहा वाजता व्याख्यान होणार आहे या व्याख्यानमालेचे उद्घाटन मंगळवार ७ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता कोल्हापुर येथील प्रकाशक सुरेश शिरपूरकर यांच्या हस्ते होणार आहे. ७ एप्रिलला व्याख्यानमालेचे उद्घाटन व पुरस्कार वितरण होणार आहे.
या व्याख्यानमालेत बुधवार ८ एप्रिल रोजी पुणे येथील मेधा सामंत पुरव यांचे महिला सक्षमीकरणाची पन्नास वर्षे या विषयावर व्याख्यान होणार असून अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या वंदना करंबेळकर आहेत. गुरुवार ९ एप्रिल रोजी पुणे येथील सुभाष वारे यांचे संविधान आपल्या जगण्याचा आधार या विषयावर व्याख्यान होणार आहे. अध्यक्षस्थानी कवी वीरधवल परब उपस्थित राहणार आहेत. शुक्रवार १० एप्रिल रोजी कोल्हापूर येथील डॉ. व्ही. एन. शिंदे यांचे 'जंगल प्रदूषण मानवाला संपवेल' या विषयावर व्याख्यान होणार असून अध्यक्षस्थानी बांदा येथील कॉलेजचे प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर आहेत. तर ११ एप्रिल रोजी अहिल्यानगर येथील आनंद शितोळे यांचे 'आमच्या धडावर आमचे डोके' या विषयावर व्याख्यान होणार असून अध्यक्षस्थानी निवृत्त माहिती उपसंचालक सतीश लळीत आहेत. जयानंद मठकर व्याख्यानमालेचे औचित्य साधून दरवर्षी काही पुरस्कार जाहीर केले जातात.
यंदाचा मठकर स्मृती पुरस्कार ओणी राजापूर येथील वात्सल्य मंदिरचे संस्थापक डॉ. महेंद्र मोहन यांना प्रदान करण्यात येणार आहे. सुरेश शिपुरकर यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण होणार असून यावेळी बांदा येथील मानसोपचार तज्ञ डॉ. रुपेश पाटकर यांची प्रमुख प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तर प्राचार्य अल्ताफ खान उत्कृष्ट वाचक पुरस्कार कवी मधुकर मातोंडकर यांना, प्रा. पांडुरंग येजरे कार्यकर्ता पुरस्कार सावंतवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते जयंत बरेगार यांना, तर प्रा. मिलिंद भोसले स्मृती ग्रंथालय वाचक पुरस्कार सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका राजश्री टिपणीस यांना प्रदान करण्यात येणार आहे. या व्याख्यानमालेचा लाभ वाचकांनी घ्यावा, असे आवाहन वाचन मंदिरचे अध्यक्ष प्रसाद पावसकर, कार्याध्यक्ष संदीप निंबाळकर आणि कार्यवाह रमेश बोंद्रे व संचालक मंडळाने केले आहे.






































.jpeg)





































































































































































































































































.jpg)























































































.jpg)





























.jpg)


































































































































































































































































































































.jpg)

























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.