loader
Breaking News
Breaking News
Foto

देवळे चाफवली परिसरात पुन्हा पावसाच्या सरी

देवळे (प्रकाश चाळके) - काही दिवसापूर्वी या भागात गारांसह पडलेला पावसाने आंबा काजू पिकाला मोठा धोका पोहोचला आहे. आज पुन्हा 11.30 वा. दरम्याने अचानक पावसाच्या सरी आल्याने उरल्या सुरल्या आंबा काजूच्या पिकांना धोका निर्माण झाला आहे. तसेच शेतीची (मशागत) भाजावळ करण्यासाठी केलेली तयारीही पावसाने भिजवली. सकाळपासून ढगाळ वातावरणाने पाऊस येईल असा अंदाज होता परंतु तो एवढ्या लवकर येईल असं वाटत नव्हतं. मात्र वातावरणातील बदलाने पावसाने लवकर हजेरी लावली आणि शेतीच्या भाजावळीसाठी केलेली तयारीही पावसाने भिजवली. काही लोकांनी घाई गडबडीने त्यांना आग लावली परंतु पावसाने ती विझवली. त्यामुळे पुन्हा तेवढी तयारी करावी लागणार, अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

देवळे चाफवली भागात मागील आठवड्यात गारांसह पाऊस पडला. त्यातच पुन्हा या आठवड्यात पावसाने हजेरी लावली त्यामुळे आंबा काजूच्या पिकांना फार मोठा धोका पोहोचला आहे. त्यातच वाराही सुटला असल्याने आंब्याला निर्माण होण्याची भीती शेतकरी वर्गात निर्माण झाली आहे. एप्रिल सुरू होताना पावसाने हजेरी लावल्याने आंबा काजूला फार मोठे नुकसान होणार असल्याचे शेतकरी म्हणत आहेत. एकूणच आंबा काजूला धोका निर्माण झाला असताना शेतीच्या मशागतीतही पावसाने पाणी फेरले असल्याचे शेतकरी म्हणत आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg