मालवण (प्रतिनिधी) - जिल्ह्यात पेट्रोलपंपवर कॅनमध्ये पेट्रोल देण्यास जिल्हा प्रशासनाने मनाई केल्यामुळे मालवण मधील सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक होडी व्यवसायिकांना पेट्रोल मिळेनासे झाले आहे. पेट्रोल न मिळाल्यास किल्ला होडी सेवा ठप्प पडून व्यवसायिकांचे नुकसान होण्याची भीती सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष मंगेश सावंत यांनी व्यक्त केली असून याबाबत शासनाने लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणी केली आहे.
आखातातील युद्धाच्या परिणामामुळे भारतात तेलाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर पेट्रोल पंपवर बाटली किंवा कॅनमध्ये पेट्रोल देऊ नये, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. मालवणमध्ये ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्ग दर्शनासाठी प्रवासी होडी वाहतुकीची सोय असून या होड्यांसाठी पेट्रोलची आवश्यकता असते. हे पेट्रोल कॅनद्वारेच आणून इंजिनमध्ये भरले जाते. मात्र, पेट्रोल पंपवर होडी व्यवसायिकांना कॅनमध्ये पेट्रोल देण्यास नकार देण्यात येत असल्याने व्यावसायिक चिंताग्रस्त झाले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या निर्बंधामुळे होडी व्यावसायिक अडचणीत आले आहेत.
सध्या उन्हाळी पर्यटन हंगामाचा महत्वाचा टप्पा सुरु होत असून सिंधुदुर्ग किल्ला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक मालवणात येत आहेत. अशा स्थितीत पेट्रोल अभावी होडी सेवा बंद राहिल्यास ऐन पर्यटन हंगामात होडी व्यवसायिकांना मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. यापूर्वी लॉकडाऊन तसेच वादळे, नैसर्गिक संकटे यामुळे होडी व्यवसायिकांना नुकसान सहन करावे लागले आहे, तशी वेळ पुन्हा येऊ नये यासाठी शासनाने किल्ला प्रवासी होडी व्यवसायिकांना पेट्रोल वितरणातील निर्बंधातून सूट द्यावी, अशी मागणी मंगेश सावंत यांनी केली आहे.






























































































































































.jpg)























































































.jpg)





























.jpg)
































































































































































































































































































































.jpg)

















93.jpg)






3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.