loader
Breaking News
Breaking News
Foto

पनवेल येथे आयोजित काँग्रेसच्या संघटन सृजन अभियानाला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल (वार्ताहर) : पनवेल शहरातील तथास्तु सभागृह येथे काँग्रेस पक्षाला उभारी देण्यासाठी संघटन सृजन अभियान आयोजित करण्यात आले. या बैठकीत राष्ट्रीय प्रवक्त्या डॉ. रागिणी नायक यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. प्रतिकूल परिस्थितीत काँग्रेस पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी नेहरू-गांधी यांच्या विचारांची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या प्रसंगी राष्ट्रीय प्रवक्त्या डॉ. रागिणी नायक, प्रदेश निरीक्षक ऍड तौफिक मुलाणी, प्रदेश निरीक्षक श्रीरंग बरगे, पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी बोलताना राष्ट्रीय प्रवक्त्या डॉ. रागिणी नायक यांनी सांगितले कि, राहुल गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या मार्गदर्शनानुसार गावा-गावात जाऊन आम्ही विविध समाजातील लोकांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न जाणून घेतले. समाजातील शेवटच्या व्यक्तीला न्याय देण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करत आहे. त्याचप्रमाणे पक्षांतर्गत मोठ्या प्रमाणात बदल घडणार असून कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांच्या भावना जाणून घेत आहोत. त्याप्रमाणे नवीन कार्यकारिणी जाहीर करणार असल्याचे सांगितले.

टाइम्स स्पेशल

यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी पनवेल शहर जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष हेमराज म्हात्रे, महिला आघाडी प्रभारी चंद्रकला नायडू, नगरसेवक हरेश केणी, लतीफ शेख, कामगार नेते वैभव पाटील, ऍड श्रुती म्हात्रे, शशिकांत बांदोडकर, डॉ अमित दवे, अमित लोखंडे, सुधीर मोरे, राकेश जाधव आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg