loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा तहसिलदार यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाच्या विविध योजनांमध्ये पात्र अर्जदारांचे प्रस्ताव मंजूर

लांजा (संजय साळवी) - संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत मागील एका वर्षात लांजा तालुक्यातून विविध प्रस्ताव प्राप्त झाले असून पात्र लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य देण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून राबविण्यात आली आहे. फेब्रुवारी २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत तालुक्यातून एकूण २०७ अर्जदारांचे प्रस्ताव प्राप्त झाले होते. यापैकी १७८ प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून २९ प्रस्ताव नामंजूर करण्यात आल्याची माहिती लांजा तहसिलदार प्रियांका ढोले यांनी दिली. लांजा तहसिल कार्यालयात प्राप्त झालेल्या संजय गांधी निराधार योजनेचा प्रस्तावांमध्ये विविध घटकांचा समावेश होता. यामध्ये दिव्यांग निराधार गटातील आलेल्या ७७ प्रस्तावांपैकी ६५ प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून १२ प्रस्ताव नामंजूर करण्यात आले आहेत. विधवा महिलांच्या ३३ प्रस्तावांपैकी २२ प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून ११ प्रस्ताव नामंजूर करण्यात आले आहेत. तसेच अविवाहित महिलांचे ४ प्रस्ताव प्राप्त झाले होते, हे चारही प्रस्ताव मंजूर करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याशिवाय दुर्धर आजार असलेल्या लाभार्थ्यांचे ६ प्रस्तावांपैकी ५ प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. तर श्रावणबाळ योजनेअंतर्गत ८४ प्रस्ताव प्राप्त झाले होते, त्यापैकी ७९ प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत प्राप्त झालेल्या ३ प्रस्तावांपैकी तीनही प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. तर इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजनेचा एकही प्रस्ताव प्रशासनाकडे प्राप्त झालेला नाही. दरम्यान, सर्व प्रस्तावांची छाननी करून लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती पडताळणी करण्यात आली होती. त्यानंतर लांजा तहसिलदार प्रियांका ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली प्राप्त अर्जांची तपासणी करून निकषात बसणाऱ्या पात्र अर्जदारांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. संजय गांधी निराधार योजना ही समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, निराधार, दिव्यांग आणि विधवा महिला अशा विविध घटकांना आधार देणारी योजना असून तालुक्यातील नागरिकांनी शासनाच्या अशा योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन लांजा तहसिलदार प्रियांका ढोले यांनी केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg