loader
Breaking News
Breaking News
Foto

लाडघर येथील हाॅटेल व्यवसायिकांना गॅस सिलेंडर टंचाईचा फटका

दापोली (प्रतिनिधी) - लाडघर येथील समुद्र किनारा हा स्वच्छ सुंदर समुद्रकिनारा आहे. हे ठिकाण डॉल्फिन सफारी आणि नेत्रदीपक सूर्यास्त दृश्यांसाठी प्रसिद्ध असे ठिकाण आहे. लाडघर बिचला पर्यटकांची पहिली पसंती मिळते त्यामुळे येथे पर्यटकांचा येण्याचा ओघ सतत वाढत चालला आहे. पर्यटन व्यवसायामुळे बेरोजगारांच्या हाताला आपल्या गावातच काम मिळाले आहे. मात्र हाच येथील स्थानिका़च्या बेरोजगारीवर मात करणारा व्यवसाय अडचणीत सापडला आहे. आखाती देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे सध्या जसे इंधन टंचाई सुरू झाली आहे तसे गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत होत नसल्याने गॅस सिलिंडरच्या टंचाईमुळे येथील हॉटेल व्यवसायिकांना चुली पेटवाव्या लागत आहेत याचा परिणाम एकूणच व्यवसायावर होत आहे. चुलीमुळे जेवण झटपट करून देता येत नाही तसेच चुली पेटवण्यामुळे सगळीकडे धुर सुद्धा पसरला जातो. त्यामुळे ही येथील समस्या निकाली काढण्यासाठी शासन आणि प्रशासनाने मिळून ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg