loader
Breaking News
Breaking News
Foto

देवबाग येथील विठ्ठल-रखुमाई मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापनेचा वर्धापन दिन

मालवण (प्रतिनिधी) - देवबाग येथील श्री देव विठ्ठल रखुमाई मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापनेचा ८१ वा वर्धापनदिन गुरुवार दि. ९ एप्रिल रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने पहाटे श्रींच्या मूर्तीवर अभिषेक व नित्यपूजा होणार असून दिवसभर भाविकांसाठी देवदर्शन खुले राहील. दुपारी ३.३० वाजता श्री सत्यनारायण महापूजेस प्रारंभ होईल. सायंकाळी ६ वाजता श्रींच्या प्रतिमांची मंदिराभोवती पालखी परिक्रमा काढण्यात येईल. त्यानंतर ६.३० वाजता महाआरती व तीर्थप्रसादाचे वितरण होईल. रात्री १० वाजता अमृतनाथ दशावतार नाट्यमंडळाकडून पौराणिक नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहे. शुक्रवार, १० एप्रिल रोजी दुपारी १२.३० वा. पासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देव विठोबा देवालय, देवबागचे विश्वस्त, अध्यक्ष व ग्रामस्थ यांच्यावतीने करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg