loader
Breaking News
Breaking News
Foto

खेडमध्ये उबाठा कार्यकर्त्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश

खेड (प्रतिनिधी) - रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात जामगे येथे शिवसेनेत मोठा पक्षप्रवेश पार पडला असून उद्धव बाळासाहेब ठाकरे गट (उबाठा) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जोरदार धक्का बसला आहे. शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाने प्रेरित होऊन उबाठा गटाचे तालुकाप्रमुख दत्ता भिलारे यांच्यासह भिलारे आयनी व साखरोली गावातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना नेते रामदास कदम व गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या पक्षप्रवेशात आत्माराम गोपाळ कडू, मधुकर लाडू शेट्ये, सौ. रमणा शंकर शेट्ये, सुभाष भिकाजी शेट्ये, खाजीराम आत्माराम कदम, बाळू वसंत शिंदे, रामदास नामदेव परब, बाबुराव लाडू शेट्ये, सुभाष शेट्ये, तुकाराम कदम, हेमंत रवींद्र परब, अभिजीत आत्माराम कदम, निलेश विठोबा पाटील, केशव दत्तात्रय शेट्ये, जयवंत शंकर शेट्ये तसेच श्रीमती मिनाक्षी यांसह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश होता. तसेच दत्ताराम वामन किलोर, गोविंद नामदेव किलोर, रमेश बाळकृष्ण किलोर, विशाल विनायक किलोर आणि रंजीत संजय किलोर यांनीही शिवसेनेत प्रवेश करत पक्षाची ताकद वाढवली. या कार्यक्रमावेळी शिवसेना नेते व माजी मंत्री रामदास भाई कदम,माजी आ संजय कदम रायगड लोकसभा संपर्कप्रमुख अनिल नवघरे, जिल्हा परिषद सदस्य व खेड तालुका प्रमुख सचिन धाडवे तसेच जिल्हा परिषद सदस्य अरुण (अण्णा) कदम उपस्थित होते. या घडामोडीमुळे खेड तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत असून उबाठा गटाला विशेषतः तालुकाप्रमुखांच्या पक्षप्रवेशामुळे मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. शिवसेनेची ताकद या भागात आणखी बळकट झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg