loader
Breaking News
Breaking News
Foto

आयनीढाकर शाळेला डिजिटल शिक्षणाची नवी दिशा; वैभवी खेडेकर यांच्या हस्ते साहित्य वितरण

खेड (प्रतिनिधी) : कोकणातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक आणि दर्जेदार शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या शाळा डिजिटल करण्याच्या उपक्रमाला खेड तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. याच उपक्रमांतर्गत खेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आयनीढाकर येथे डिजिटल शैक्षणिक साहित्याचे वितरण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला भाजपा विद्यमान नगरसेविका वैभवी वैभव खेडेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार अ‍ॅड. निरंजन डावखरे यांच्या आमदार निधीतून या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाधारित शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याचा हा प्रयत्न आहे. कार्यक्रमादरम्यान संगणक (CPU), मॉनिटर, प्रिंटर तसेच डिजिटल शिक्षणासाठी आवश्यक असलेली विविध साधनसामग्री शाळेला प्रदान करण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत शिक्षण घेण्याची संधी मिळणार असून त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होण्यास मदत होणार आहे.

टाईम्स स्पेशल

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे, शहर अध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार यांच्यासह शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांची गरज अधोरेखित केली. या डिजिटल उपक्रमामुळे आयनीढाकर परिसरातील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाची नवी दिशा मिळणार असून शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg