loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोलीतील केळशी येथे जैन युवक मंडळ केळशी तर्फे महावीर जयंती कार्यक्रम उत्साहात

दापोली (प्रतिनिधी) - तालुक्यातील केळशी ही एक प्रमुख व्यापारी बाजारपेठ आहे. या केळशी गावाला एक सांस्कृतिक, धार्मिक, ऐतिहासिक वारसा असलेली फार जूनी पंरपरा आहे सध्या हेच गाव पर्यटन दृष्ट्या विकसित होत आहे. त्यामुळे या गावात पर्यटक येण्याचा ओघ चांगलाच वाढला आहे. अशा या केळशी परिसरातील गावांसाठी बाजारपेठ असलेल्या गावातील व्यापारी बांधवांनी आपल्या केळशी जैन युवक मंडळातर्फे भगवान महावीर जयंती उत्सव सोहळा कार्यक्रम पारंपरिक पध्दतीने अहिंसे चे उपदेश देत मोठ्या उत्साहात साजरा केला. केळशी येथील जैन युवक मंडळाचे अध्यक्ष महेंद्र बोहरा यांच्या निवासस्थानापासून भगवान महावीरांची भव्य रथ मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक केळशी बाजारपेठ, सोनार आळी येथून सुप्रसिद्ध महावीर भवन केळशी येथपर्यत काढण्यात आलेल्या या मिरवणुकिची सांगता मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

भगवान महावीर यांच्या रथ मिरवणुकी दरम्यान भगवान महावीरांच्या पुजे दरम्यान करण्यात आलेल्या आरतीतील श्रीफळांची बोली होते. या बोलीला येथे फार मोठी आणि जूनी परंपरा आहे. देवाचा प्रसाद म्हणून प्रत्येक जण या श्री फळांच्या बोलीतील लिलावात हिरीरीने भाग घेतो तसे यावेळीही उपस्थित जैन बांधवांनी भाग घेतला. केळशी येथील बाजार पेठेतून मोठ्या उत्साहात निघालेल्या भगवान महावीर रथ मिरवणुकीत महेंद्र बोहरा, राजेंद्र प्रतामल जैन, नरेंद्र कोठारी, संतोष कोठारी, दिलिप कोठारी, रुपेशकुमार बोहरा, निलेश बोहरा, राजेंद्र बोहरा, सुभाषशेठ बोहरा, बन्शीशेठ बोहरा, नितीन कोठारी, महेंद्र कोठारी, कुणाल बोहरा, प्रेम जैन, प्रतिक जैन, दिपू गांधी, अमित कोठारी, नरेंद्र जैन, दिलीप कोठारी, योगेश कोठारी(मुंबई), गौरव जैन(चिपळूण), शांतीलाल कोठारी(पुणे), अक्षय मुनोत (पुणे), संतोष कोठारी आदी़सह अनेक महिला भगीनींसह जैन बांधव मोठ्या संख्येने उत्साहात सहभागी झाले होते.

टाईम्स स्पेशल

केळशी येथे जैन युवक मंडळ केळशी तर्फे उत्साहात व पारंपरिक पध्दतीने अहिंसे चे उपदेश देत महावीर जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी दापोली पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेश तोरसकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पीएसआय पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल राजू भगवान मोहीते, जितेंद्र लहामगे आदींनी चोख बंदोबस्त तैनात ठेवला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg