loader
Breaking News
Breaking News
Foto

कळणे मुक्तद्वार ग्रंथालय वार्षिक सभेत नवीन कार्यकारिणी जाहीर

दोडामार्ग (प्रतिनिधी) - दोडामार्ग तालुक्यातील कळणे एक मोठे मुक्तद्वार ग्रंथालय म्हणून कळणे ओळखले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून हे ग्रंथालय सुरू आहे. अनेक वाचक येथे येतात पुस्तके घेऊन जातात. या ग्रंथालयमुळे अनेकांच्या ज्ञानात भर पडत आहे. कळणे मुक्तद्वार ग्रंथालय वार्षिक सभा सर्व सभासद ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी मुक्तद्वार ग्रंथालय कळणे अध्यक्ष म्हणून सामाजिक कार्यकर्ते माजी जि. प. सदस्य एकनाथ नाडकर्णी यांची नियुक्ती केली. हरिश्चंद्र भिसे यांच्या हस्ते नवीन अध्यक्ष यांचे स्वागत करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मुक्तद्वार ग्रंथालय कळणे संस्थेची वार्षिक सभा ग्रंथालयात वाचक सभासदांच्या उपस्थित पार पडली. यावेळी, २०२६/२०२९, पर्यंत नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. अध्यक्ष एकनाथ अनंत नाडकर्णी, उपाध्यक्ष प्रशांत लक्षमण नाईक, सचिव सुरेंद्र विरनोडकर, सहसचिव न्हानु पुंडलिक देसाई, सदस्य अजित मनोहर देसाई, गुरुनाथ वासुदेव म्हावळंणकर, महिला सदस्या श्रीमती सुषमा प्रदीप सावंत, सल्लागार हरिश्चंद्र भिसे, हरिश्चंद्र रामा मणेरी, अशा प्रकारे खेळीमेळीच्या वातावरणात सभा पार पडली. नुतन कार्यकारिणी याना शुभेच्छा देण्यात आल्या.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg