केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - कोकण मराठी साहित्य परिषद, रत्नागिरी अंतर्गत लांजा शाखा व पंचायत समिती शिक्षण विभाग, लांजा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सभासद स्नेह मेळावा लांजा येथे उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला व्यासपीठावर कोमसाप जिल्हा अध्यक्ष आनंद शेलार, जेष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर, कोमसाप शाखा लांजाचे अध्यक्ष रामचंद्र जाधव, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील चव्हाण, शिक्षक नेते विनायक हातखंबकर, विजय बेर्डे, आदम मापारी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. लांजा शाखेचे अध्यक्ष रामचंद्र जाधव प्रास्ताविक केले. त्यानंतर मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त घेण्यात आलेल्या कथाकथन, वक्तृत्व आणि काव्यलेखन स्पर्धांतील विजेत्या स्पर्धकांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
त्यानंतर कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉ. माया तिरमारे, नेहा पाटोळे, अमोल जाधव, मृगया मोरे, तनुजा सरदेसाई यांचा विशेष सन्मान करण्यात आला. याचबरोबर स्पर्धांचे यशस्वी आयोजन करण्यासाठी परीक्षक म्हणून योगदान दिलेल्या डॉ. राजीव कांबळे, प्रदिप कदम, भीमराव खोत, कुमार गावडे, दिलीप चव्हाण, सविता पाटील, मृगया मोरे यांचा सन्मान करण्यात आला. विजेत्यांमधून अथर्व पाध्ये, सोनाली कदम तर विशेष सन्मान करण्यात आलेल्या तनुजा सरदेसाई यांनी मनोगत व्यक्त केले. सन्मान सोहळ्यानंतर प्रमुख वक्ते राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी “अभिजात मराठी भाषा” या विषयावर मार्गदर्शन करताना मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्याची आजच्या काळातील गरज अधोरेखित केली. त्यांनी भाषेच्या समृद्ध परंपरेचा उल्लेख करत नव्या पिढीने मराठी साहित्याशी नाते दृढ ठेवावे, असे आवाहन केले.
अध्यक्षीय मनोगतात आनंद शेलार यांनी कोकण मराठी साहित्य परिषद शाखा यशस्वीपणे राबवत असलेल्या उपक्रमाबाबत कौतुक केले. ग्रामीण भागातील साहित्यिक चळवळीला चालना देण्यासाठी परिषद सातत्याने कार्यरत असल्याचे सांगत त्यांनी नवोदित लेखकांनी पुढे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश हरचेकर, रिया लिंगायत आणि बाळू नागरगोजे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. माया तिरमारे यांनी केले. या कार्यक्रमाला राजेश गोसावी, शहाजीराव देशमुख, प्रभाकर गवाणकर, मनिषा पाटील, नंदकुमार पाटोळे, अरुण वंजारे, लाड तसेच लांजा शाखेचे पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी व विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. साहित्यप्रेमींच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.




























1.jpg)













.jpg)




























































.jpeg)





































































































































































































































































.jpg)























































































.jpg)





























.jpg)


































































































































































































































































































































.jpg)


























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.