खेड (प्रतिनिधी) - शनिवार दिनांक 28 मार्च 2026 रोजी शिव योगा क्लासेस व राजेश सोहनी आणि कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमान यशवंत हरी गोखले भवन रत्नागिरी या ठिकाणी जिल्हास्तरीय मिस्टर योगी व मिस योगिनी योगासना स्पर्धा 2025-26 संपन्न झाल्या. यामध्ये रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी 2 सुवर्ण पदके व 1 कांस्य पदकाची कमाई केली. सदरच्या जिल्हास्तरीय योगासना स्पर्धेकरिता रत्नागिरी जिल्ह्यातील विविध शाळांतील योगापटूंनी आपला सहभाग नोंदविला होता. यामध्ये रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी इतर स्पर्धकांशी चुरशीची लढत देत अनेक पदके पटकावून जिल्हास्तरावर रोटरी स्कूलचे नाव गौरविले.
या जिल्हास्तरीय योगासना स्पर्धेमध्येे 10 वर्षांखालील मुले या वयोगटात ट्रॅडिशनल वैयक्तिक या प्रकारामध्ये आरुष पाटील - सुवर्णपदक, 14 वर्षांखालील मुले या वयोगटात ट्रॅडिशनल वैयक्तिक या प्रकारामध्ये आयुष पाटील - सुवर्णपदक, 18 वर्षांखालील मुले या वयोगटात ट्रॅडिशनल वैयक्तिक या प्रकारामध्ये स्पंदन धामणे - कांस्य पदक पटकावून यश संपादित केले. सर्व यशस्वी योगापटूंना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. त्यांच्यावर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
वरील सर्व योगापटूंना योगा प्रशिक्षक डॉ. गौरव आंब्रे व शीतल घाणेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे चेअरमन बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.













































1.jpg)













.jpg)




























































.jpeg)





































































































































































































































































.jpg)























































































.jpg)





























.jpg)


































































































































































































































































































































.jpg)



























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.