नाशिक - बहुचर्चित भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आज महत्त्वाची घडामोड घडली. खरात याला आज नाशिक जिल्हा व सत्र न्यायालय येथे कडेकोट पोलीस बंदोबस्तात हजर करण्यात आले. न्यायालयाने सुनावणीदरम्यान त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
सकाळपासूनच न्यायालय परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेता, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेण्यात आली. खरातला पोलिसांनी गर्दीतून सुरक्षितरित्या कोर्टात आणले. खरातला न्यायालयात हजर केल्यानंतर सुनावणी अत्यंत जलद पार पडली. अवघ्या 5 मिनिटांत कोर्टाने निर्णय देत न्यायालयीन कोठडी सुनावली, त्यानंतर लगेचच त्याला पुन्हा पोलीस ताब्यात घेऊन बाहेर काढण्यात आले.
अशोक खरातवर विविध गंभीर आरोप असून, त्यात फसवणूक, अंधश्रद्धा पसरवणे तसेच इतर बेकायदेशीर कृत्यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणामुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे. आता खरातला न्यायालयीन कोठडी मिळाल्यामुळे पुढील चौकशी आणि पुरावे गोळा करण्याची प्रक्रिया अधिक वेगाने होणार आहे. पोलीस यंत्रणा या प्रकरणातील इतर संबंधितांवरही लक्ष ठेवून आहे.या संपूर्ण प्रकरणाकडे राज्यभरातून लक्ष लागले असून, पुढील काही दिवसांत आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.









































































1.jpg)













.jpg)




























































.jpeg)





































































































































































































































































.jpg)























































































.jpg)





























.jpg)


































































































































































































































































































































.jpg)





























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.