मंडणगड (प्रतिनिधी) - श्री विठ्ठल रखुमाई मंदिर श्री क्षेत्र शेनाळे तालुका मंडणगड येथे गुरुवर्य श्री स्वानंद सुखनिवासी श्री संत जगद्गुरु स्वामी गणेशनाथ महाराज यांच्या प्रेरणेने तसेच प.पू. गुरुवर्य सद्गुरू स्वामी तपोनिधी अरविंदनाथ गणेशनाथ महाराज यांच्या कृपाशीर्वादाने गेले पाच दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांने आयोजित केलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची मोठ्या उत्साहात भक्तिमय मंगलमय वातावरण सांगता करण्यात आली. महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाचा मोठा उत्सव म्हणून ओळखला जाणारा 'अखंड हरिनाम सप्ताह' विविध ठिकाणी अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा केला जातो. सप्ताहात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, काकडा आरती, हरीपाठ, आणि कीर्तनातून संत विचारांचा जागर केला जातो, ज्यामुळे परिसरातील वातावरण आध्यात्मिक बनते. अशा या आयोजित केल्या जाणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहात काकडा आरती, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, हरीपाठ आणि सायंकाळी नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा हे या सप्ताहाचे मुख्य आकर्षण असते. अशा या आयोजन करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांमधून सामाजिक ऐक्य सप्ताहाच्या माध्यमातून ग्रामीण भागात एकता व सुसंस्कृत समाज निर्मितीचा संदेश दिला जातो. अनेक ठिकाणी सप्ताहाची सांगता दिंडी सोहळा आणि महाप्रसादाने केली जाते, ज्यात परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होतात.
असे हे सप्ताह केवळ धार्मिक नसून ते वारकऱ्यांचा महाउत्सव मानले जातात, जेथे संत विचारांची प्रेरणा दिली जाते. अखंड हरिनाम सप्ताह हा वारकरी सांप्रदायिक धार्मिक सामूहिक उपासना करण्याचा एक प्रकार आहे. अशाच प्रकारचा अखंड हरिनाम सप्ताह मंडणगड तालुक्यातील शेनाळे येथे १९८८ पासून दरवर्षी साजरा केला जातो. यावर्षी अखंड हरिनाम सप्ताह साजरा करण्याचे ३८ वे वर्ष आहे. दरवर्षी या अखंड हरिनाम सप्ताहाचा उत्साह हा वाढत चालला आहे. अशा या यावर्षी आयोजित केलेला अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात नंदिनी संजय शिंदे या उभयतांच्या हस्ते श्रींची महापूजा करून करण्यात आला. तर विणापुजन व ध्वजारोहण सुश्मिता सुनील मनवे या उभयतांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर महाआरतीचा कार्यक्रम पार पडला.
सप्ताह काळात ह.भ.प. बैकर महाराज (शेनाळे), ह.भ.प. सतिश महाराज सकपाळ (चाकाळे, खेड), ह.भ.प.मनिष महाराज चव्हाण (शिरसाडी. दापोली), ह.भ.प. बापू महाराज (पाटण) यांच्या प्रवचनाचे कार्यक्रम तर ह.भ.प. अनंत महाराज शिंदे (आदिस्ते, महाड), ह.भ.प. सतिश महाराज सकपाळ (चाकाळे, खेड), ह.भ.प. मनिष. महाराज चव्हाण (शिरसाडी दापोली) ह.भ.प. बापू महाराज (पाटण) यांची किर्तनसेवा पार पडली. तर हरिजागरणाचा कार्यक्रम ह.भ.प. मधुकर महाराज शिंदे (आदिस्ते महाड), ह.भ.प. तुकाराम बुवा चव्हाण (आवाशी), ग्रामविकास मंडळ शेनाळे व श्री विठ्ठल रखुमाई महिला मंडळ शेनाळे यांनी पार पाडला. तसेच पाटण येथील सुप्रसिध्द किर्तनकार ह.भ.प. बापू महाराज यांनी काल्याचे किर्तन करत अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता केली. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला आणि श्रींच्या पालखी मिरवणूकीने मोठ्या उत्साहात अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम उत्साहात भक्तिमय वातावरणात पार पाडण्यासाठी ग्रामविकास मंडळ शेनाळे, श्री विठ्ठल रखुमाई महिला मंडळ, शेनाळे, श्री भैरी जोगेश्वरी शेनाळे ग्रामस्थ मंडळ मुंबई, श्री भैरी जोगेश्वरी शेनाळे महिला मंडळ मुंबई, शेनाळे ग्रामस्थ मंडळ पूणे तसेच श्री भैरीनाथ क्रिकेट संघ शेनाळे यांनी प्रचंड मेहनत घेतली.









































.jpeg)





































































































































































































































































.jpg)























































































.jpg)





























.jpg)


































































































































































































































































































































.jpg)

























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.