वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर शहर क्रिकेट संघटनेतर्फे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या गुहागर शहर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत जहूर वाँरियर्स संघाने विजेते पटकावले. ही स्पर्धा व्याघ्रंबरी मंदिरासमोरील मैदानात पार पडली. या स्पर्धेत द्वितीय क्रमांक कन्हैया प्ले स्कुल, तृतीय क्रमांक ब्रह्मा वाँरियर्स, चतुर्थ क्रमांक गुहागर जिमखाना यांनी पटकावला. तर मालिकावीर यश लोखंडे, उत्कृष्ट फलंदाज प्रणव देवकर, उत्कृष्ट गोलंदाज विराज लोखंडे, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक मंदार मोरे, अंतिम सामन्यातील सामनावीर यश लोखंडे, उगवता तारा रूद्र पावसकर, आर्यन साटले, षटकार किंग यश लोखंडे यांना घोषित करण्यात आले.
या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस पंचवीस हजार व चषक, द्वितीय क्रमांक पंधरा हजार रुपये व चषक तसेच तृतीय व चतुर्थ क्रमांकाचे बक्षीस पाच हजार व आकर्षक चषक तसेच मॅन ऑफ द सिरीससाठी सायकल तर उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज व सामनावीर यांना आकर्षक चषक बक्षीस देण्यात आली. या स्पर्धेसाठी जय मल्हार वॉरियर्स, कन्हैया प्ले स्कूल, गुहागर फायटर्स, ओम साई इलेव्हन, जिजा इलेव्हन, गावदेवी वॉरियर, नरू दादा वॉरियर, गुहागर जिमखाना, ब्रह्म वॉरियर्स व जुहूर वॉरियर्स या सहा या दहा संघाने स्पर्धेसाठी सहभाग घेतला होता. स्पर्धेसाठी गुहागर शहरातील सर्व खेळाडूं व नागरिकांनी मेहनत घेतली.





































































































































































































































































.jpg)























































































.jpg)





























.jpg)


































































































































































































































































































































.jpg)

























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.