loader
Breaking News
Breaking News
Foto

कालावल खाडीपात्रातील बेकायदेशीर वाळू उपशावर महसूल विभागाची धडक कारवाई

मालवण (प्रतिनिधी) - मालवण तालुक्यातील कालावल खाडीपात्रात होत असलेल्या बेकादेशीर बाळू उत्खननावर कारवाई करण्याची मागणी जोर धरत असतानाच काल मालवण महसूल विभागाच्या पथकाने कालावल खाडीपात्रात धडक कारवाई करत एकाचवेळी वाळूने भरलेल्या सहा होड्या पकडल्या. या कारवाई दरम्यान कालावल पुलावरून महसूल पथक दिसून आल्यानंतर वाळू उत्खनन करणाऱ्या कामगारांनी बोटी खाडीपात्राच्या मध्यभागी नेऊन ठेवत पळ काढला. बंदर विभागाकडे खाडीपात्रातील होड्यांवर कारवाई करण्यासाठी बोट उपलब्ध नसल्याने खाडीपात्रात वाळूने भरलेल्या होड्या सायंकाळी उशिरापर्यंत तशाच होत्या, तर किनाऱ्यावर सापडून आलेल्या तीन होड्या जप्त करीत स्थानिक पोलीस पाटलांच्या ताब्यात देण्यात आल्या. ही कारवाई तहसीलदार गणेश लव्हे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मालवण तालुक्यातील कालावल खाडीपात्रात बेकादेशीर वाळू उत्खनन होत असल्याच्या अनेक तक्रारी महसूल विभागाकडे प्राप्त झाल्याने गुरुवारी महसूल विभागाच्या कोळंब मंडळ अधिकारी मिनल चव्हाण, आचरा मंडळ अधिकारी उमेश शिंगनाथ, मसुरे मंडळ अधिकारी दीपक शिंग्रे हे कालावल पूल या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्यांना खाडीपात्रात बेकादेशीर वाळू उत्खनन होत असल्याचे दिसून आले. यावेळी महसूल विभागाने बंदर व पोलीस विभागाला कारवाईसाठी पाचारण केले. यात बंदर निरीक्षक रजनीकांत पाटील, हडी ग्राम महसूल अधिकारी नीलेश वरुडे, वायंगणी ग्राम महसूल अधिकारी प्रकाश गायकवाड, देऊळवाडा ग्राम महसूल अधिकारी मागवत जाधव, सडेवाडी ग्राम महसूल अधिकारी आकाश कन्हाळे आणि पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीत धडक कारवाई करण्यास सुरुवात केली. महसूल विभागाचे पथक पाहून वाळू उत्खनन करणाऱ्या कामगारांनी काही होड्या खाडीपात्राच्या मध्यभागी नेत किनाऱ्यावर पळ काढला तर काहींनी पाण्यात उड्या मारून पळ काढला. अनधिकृत वाळू उत्खनन करीत असलेल्या होड्यांतील लोकांना पथकाची चाहूल लागताच सदरच्या होड्या हडी गावकरवाडा, वायंगणी व तोंडवळीच्या दिशेने पळविल्या, सदरच्या होड्या पाण्यात असल्याने बंदर निरीक्षक यांच्या कार्यालयाकडे पाण्यामध्ये असलेल्या होड्यांवर कारवाई करण्यासाठी बोट उपलब्ध नसल्याने पाण्यातील अनधिकृत वाळू होड्यांवर कारवाई करणे शक्य झाले नव्हते, मात्र किनाऱ्यावरील तिन्ही होड्यांवर कारवाई करण्यात आली.

टाईम्स स्पेशल

कोथेवाडी खाडीपात्रालगत महसूल पथकाला पाहणी दरम्यान सुमारे तीन ब्रास वाळूने भरलेल्या दोन होड्या आढळून आल्या. या होड्यांमध्ये वाळू उत्खननासाठी वापरण्यात येणारे बांबू, घमेली इत्यादी साहित्य आढळून आले तसेच गावकरवाडा खाडीपात्रालगत सुमारे दीड ब्रास वाळूने भरलेली एक होडी पथकाला आढळून आली, या होडीमध्ये वाळू व्यतिरिक्त वाळू उत्खनन साहित्य दिसून आले. दोन्ही होड्या पथकामार्फत बदर निरीक्षक मालवण यांनी संबंधित गावाच्या पोलीस पाटील यांच्या ताब्यात दिल्या. वाळू उत्खननासाठी वापरण्यात गावकरवाडा येथे खाडीपात्रालगत येणारे रॅम्प दिसून आले. संबंधित जमीन मालक यांना नोटीस बजावणी करण्यात आली. सदरचे रॅम्प तात्काळ काढण्याबाबत तसेच सदरचे रॅम्प यापुढे दिसून आल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी समज जमीन मालकांना देण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg