loader
Breaking News
Breaking News
Foto

कुरवल जावळी गावाची ग्रामदेवता श्री मानाई देवीचा वार्षिक जत्रोत्सव ७ एप्रिल रोजी

खेड - रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कुरवल जावळी गावातील श्री मानाई देवीची जत्रा दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी चैत्र कृष्ण पक्ष पंचमी या शुभमुहूर्तावर दिनांक ७ एप्रिल २०२६ रोजी संपन्न होणार आहे. सकाळी ८ वाजता मंदिरात स्थापित देवदेवतांची महापूजा, सकाळी ९ ते १० वाजता लाटेची पूजा व लाट पाडणे, सकाळी १० ते १२ वाजता लाटेची मिरवणूक, दुपारी १२.३० ते २ वाजेपर्यंत महाप्रसाद, सायंकाळी ५ ते ६ वाजता लाट बगाडावर चढविणे, रात्री ९.३० ते १०.३० निमंत्रित पालख्यांचे आगमन, स्वागत, पालखी भेट, रात्री १०.३० ते १२ वाजता निमंत्रित पालख्यांसह श्री मानाई मातेचा छबिना, रात्री १२ वाजता लोकनाट्य तमाशा आदी कार्यक्रम संपन्न होणार आहेत. जत्रेचा सोहळा पाहण्यासाठी सहकुटुंब, सहपरिवार, मित्रमंडळी उपस्थित राहावे व दर्शन सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कुरवल जावळी ग्रामस्थ, श्री मानाई देवी देवस्थान कमिटी आणि सभासद व कुरवल जावळी ग्रामविकास मंडळ मुंबई, पुणे यांच्यावतीने करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg