रत्नागिरी: रणरणत्या उन्हाचे चटके सोसणाऱ्या रत्नागिरीकरांसाठी एक अतिशय थंडगार आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. मे महिन्याच्या झळा लागण्यापूर्वीच शहरात पाणीटंचाईचे सावट निर्माण होईल की काय, अशी धास्ती लागली असतानाच 'शीळ' धरण सुस्थितीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. रत्नागिरीकरांची तहान भागवणाऱ्या शीळ धरणामध्ये आगामी दोन महिने पुरेल इतका मुबलक साठा शिल्लक असून, यंदा उन्हाळ्यात पाणीकपातीचे संकट टळले आहे.
नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे, मुख्याधिकारी वैभव गारवे आणि पाणी सभापती निमेश नायर यांनी प्रत्यक्ष धरणस्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. १ एप्रिल २०२६ रोजीच्या अधिकृत आकडेवारीनुसार, धरणात सध्या १.६७९ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. रत्नागिरी शहराची दैनंदिन गरज साधारणपणे २० एमएलडी इतकी आहे. या गणितानुसार, धरणातील हा साठा पुढील ७० दिवस, म्हणजेच एप्रिल आणि मे महिना संपल्यानंतरही जूनच्या सुरुवातीपर्यंत पुरेसा ठरणार आहे. विशेष म्हणजे, अनेक वर्षांच्या अनुभवानंतर यंदा नागरिकांना दररोज पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे. पाणी सभापती निमेश नायर यांनी या नियोजनाबाबत माहिती देताना सांगितले की, पाणीपुरवठा योजना पूर्ण होऊन दोन वर्षे झाल्याने आता तांत्रिक व्यवस्था स्थिर झाली आहे. त्यामुळे शहरातील सर्वच भागांत पुरेसा दाब राखून पाणी पोहोचवले जात आहे. उन्हाळ्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन होऊन साठ्यात काही प्रमाणात घट होणे अपेक्षित असले, तरी त्याचे नियोजन आधीच करण्यात आले आहे. त्यामुळे कडक उन्हाळ्यातही नळांना पाणी खेळते राहणार आहे.
विकासकामांच्या आड येणाऱ्या अडचणींबाबत बोलताना प्रशासनाने स्पष्ट केले की, सध्या शहरात रस्ते आणि सीएनजी वाहिनीची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. या कामांमुळे अधूनमधून पाइपलाइनमध्ये बिघाड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, अशा प्रसंगी नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून तातडीने दुरुस्ती पथके तैनात करण्यात आली आहेत. दर महिन्याला पाणीसाठ्याचा फेरआढावा घेतला जाणार असून, सध्यातरी रत्नागिरीकरांना पाणीटंचाईची चिंता करण्याची गरज उरलेली नाही. नगरपालिकेच्या या तत्पर नियोजनामुळे जनतेतून समाधान व्यक्त होत आहे.




























1.jpg)













.jpg)




























































.jpeg)





































































































































































































































































.jpg)























































































.jpg)





























.jpg)


































































































































































































































































































































.jpg)


























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.