loader
Breaking News
Breaking News
Foto

ग्राम रोजगार सेवकांच्या प्रलंबित मागण्या तातडीने पूर्ण न केल्यास ६ एप्रिल रोजी काम बंद आंदोलन इशारा

दोडामार्ग (प्रतिनिधी) - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामरोजगार सेवकांच्या प्रलंबित मागण्या आणि थकीत मानधनाप्रश्न दोडामार्ग तालुका ग्रामरोजगार सेवकांच्यावतीने तहसीलदार यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले. शासनाच्या ३ ऑक्टोबर २०२४ च्या निर्णयाची अंमलबजावणी करावी आणि रखडलेले मानधन तत्काळ द्यावे, अन्यथा ६ एप्रिल रोजी काम बंद आंदोलन केले जाईल असा इशारा दिला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दोडामार्ग तालुक्यातील ग्राम रोजगार कामगार यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, दिनांक ३ ऑक्टोबर २०२४ च्या शासकीय निर्णयानुसार, दरमहा ८००० रुपये मानधन आणि २००० रुपये श्रमदान निश्चित करण्यात यावे. १ ऑक्टोबर २०२४ ते मार्च २०२६ पर्यंत भत्ता मिळण्याबाबत. २०१९ पासून मार्च २०२६ पर्यंत प्रवास खर्च आणि इतर स्टेशनरी खर्च, ग्राम रोजगार सहाय्यकांसाठी विमा संरक्षण मिळण्याबाबत, जुन्या कार्यपद्धतीनुसार जानेवारी ते मार्च २०२६ पर्यंत मानधन तात्काळ मिळण्याबाबत, तसेच ग्राम रोजगार देण्यास टाळाटाळ करणाऱ्या ग्रामपंचायत आणि संबंधित कर्मचाऱ्यांना २ एप्रिल २०२६ पर्यंत मानधन देण्याबाबत ग्रामपंचायत अधिकारी टाळाटाळ करत आहेत. त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली रिक्त जिल्ह्यातील संपूर्ण रोह्यो प्रणालीचे अधिकारी आणि कर्मचारी आणि ग्राम रोजगार सेवकांची संयुक्त सल्लामसलत बैठक आयोजित करावी असे म्हटले आहे

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg