वेळणेश्वर (उमेश शिंदे) : गुहागर तालुक्यातील १८ ग्रामपंचायतीमधील २६ सदस्य पदासाठीच्या जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली असून खोडदे व चिंद्रावळे ग्रामपंचायतीसाठी थेट सरपंच पदाची पोटनिवडणूक होणार आहे. यासाठी ७ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. तालुक्यातील ज्या ग्रामपंचायतींची सदस्य व सरपंचपदे काही कारणाने रिक्त आहेत, अशा १८ ग्रामपंचायतींसाठी ही पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. यामध्ये खोडदे ग्रामपंचायतीचे सरपंच मृत झाल्याने, तर चिंद्रावळे सरपंचांनी राजीनामा दिल्याने सरपंचपद रिक्त झाले. यामुळे थेट जनतेमधून सरपंच निवडीसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. तर १८ ग्रामपंचायतीच्या रिक्त झालेल्या २६ सदस्य पदासाठीची निवडणूक होत आहे. यामध्ये ग्रामपंचायत वेळंब १ जागा, आवरे-असोरे २ जागा, पालकोट-त्रिशुळ, मढ़ाळ, वरवेली प्रत्येकी २ जागा, झोंबडी, खोडदे प्रत्येकी ३ जागा, कौंढर काळसूर, साखरीत्रिशुळ, असगोली, वेलदूर, पांगारीतर्फे हवेली, धोपावे तेटले, परचुरी, सडेजांभारी, चिखली, चिंद्रावळे व वडद येथे प्रत्येकी १ जागेसाठी निवडणूक होणार आहे. ७ ते १३ एप्रिल या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ यावेळेत अर्ज दाखल करायचे आहेत.
टाइम्स स्पेशल
गुहागरमध्ये १८ ग्रामपंचायतीच्या २६ जागांसाठी पोटनिवडणुका




















































































1.jpg)













.jpg)




























































.jpeg)





































































































































































































































































.jpg)























































































.jpg)





























.jpg)


































































































































































































































































































































.jpg)































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.