loader
Breaking News
Breaking News
Foto

तळे जांभुळवाडी शाळेची शैक्षणिक भरारी; ‘मंथन’ परीक्षेत १००% निकाल

खेड (प्रतिनिधी) - रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळे जांभुळवाडी या शाळेने शैक्षणिक क्षेत्रात आपला दबदबा कायम राखला आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या ’मंथन सामान्य ज्ञान परीक्षा २०२६’ मध्ये शाळेने १००% निकालाची परंपरा राखत दैदिप्यमान यश संपादन केले आहे. या परीक्षेमध्ये शाळेतील ३ विद्यार्थ्यांनी विशेष नैपुण्य मिळवून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांची नावे आणि गुण खालीलप्रमाणे आहेत:कु. पुष्कर अंकुश निकम (इयत्ता ४ थी) २४४/३०० गुण, कु. सिद्धी संतोष जोशी (इयत्ता ४ थी) २४४/३०० गुण, कु. धनश्री विकेश महादे (इयत्ता ४ थी) २४०/३०० गुण, कु. निशा अंकुश निकम (इयत्ता ३ री) १६०/३०० गुण, कु. मिहीर मिलिंद लव्हाळे (इयत्ता १ ली) १०६/१५० गुण.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या यशाबद्दल केंद्रप्रमुख श्री. सु. रा. पवार, मुख्याध्यापक रवींद्र हरिश्चंद्र इटकर, मार्गदर्शक शिक्षक निलेश सखाराम कांदेकर, शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा सौ. सायली संतोष जोशी आणि अध्यक्ष विकेश राजाराम महादे तसेच ग्रामस्थ मंडळ तळे जांभुळवाडी तालुका खेड यांनी विद्यार्थ्यांचे व पालकांचे अभिनंदन केले आहे. शाळेच्या या सातत्यपूर्ण यशामुळे सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg